शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिस्पर्धी उमेदवार बसले मांडीला मांडी लावून

By admin | Updated: May 13, 2014 01:11 IST

फकिरा देशमुख , भोकरदन खा़ रावसाहेब दानवे व विलास औताडे हे दोन्ही उमेदवार मनसेचे जिल्हाध्यक्ष सांडू पुंगळे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शेजारी-शेजारी बसल्याने हा विषय चर्चेचा ठरला.

 फकिरा देशमुख , भोकरदन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकासमोर प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविलेले महायुतीचे खा़ रावसाहेब दानवे व काँग्रेस आघाडीचे विलास औताडे हे दोन्ही उमेदवार मनसेचे जिल्हाध्यक्ष सांडू पुंगळे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शेजारी-शेजारी बसल्याने हा विषय वºहाडींमध्ये चर्चेचा ठरला. ११ मे रोजी सायंकाळी राजूर येथे मनसेचे जिल्हाध्यक्ष सांडू पुंगळे यांच्या कन्येचा विवाह पार पडला. पुंगळे यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबध असल्याने सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी विवाह सोहळ्यात हजेरी लावली. या समारंभासाठी खा़रावसाहेब दानवे, आ़ चंद्रकांत दानवे, आ़ संतोष सांबरे, लोकसभेतील काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे, माजी सभापती लक्ष्मणराव दळवी, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मनसेचे सुनील आर्दड, शिवाजी थोटे, माऊली गायकवाड, बबलू चौधरी, बाबूराव खरात यांच्यासह भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली होती. संयोजकांनी खा. दानवे व आ. दानवे यांच्यामध्ये असलेल्या खुर्चीवर विलास औताडे यांना जागा करून दिली. त्यामुळे खासदार व आमदारांना शेजारी बसण्याचा योग आला. विशेष म्हणजे हे दोघेही कधी शेजारी-शेजारी बसत नसल्याची चर्चा या सोहळ्यात ऐकावयास मिळाली. विलास औताडे हे मात्र दोन्ही दानवेंच्यामध्ये बसले. त्यामुळे त्यांच्या एका बाजूला लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी महायुतीचे खा़ दानवे तर दुसर्‍या बाजूला मित्र पक्षाचे आ़ दानवे विराजमान झाले. यावेळी औताडे व दानवे यांच्यात मोजकेच संभाषण झाले. मात्र, तरीही या प्रकारामुळे आजुबाजुला बसलेल्या अनेकांचे कान टवकारले. हे दोन्ही उमेदवार ‘कोणी कोणाचे काम केले’ हे तर एकमेकांना सांगत नसतील ना, अशी शंका अनेकांना आली. या निवडणुकीत मनसेने उमेदवार दिला नसल्याने त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी खा़ दानवे व औताडे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. यावेळी मनसेने ज्याला जसे पटेल, त्या उमेदवाराचे काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र, मनसेने आपलेच काम केले असे, या दोन्ही उमेदवारांना वाटत आहे. वºहाडींना मात्र आश्चर्याचा धक्का बसला. निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे नेते विवाहाच्या निमित्ताने का होईना; खुर्चीला खुर्ची लावून शेजारी बसले होते. या प्रकारामुळे वºहाडींमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. मनोगतातून चिमटे दोन्ही उमेदवार या सोहळ्यास आवर्जून हजर होते. खा़ दानवे व आ़ दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘सांडू अण्णांनी सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र केले आहे, ही कला त्याच्याकडून शिकली पाहिजे, असे सांगून दोन्ही दानवेंनी एकमेकांना चिमटा काढला.