शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

हगणदारीमुक्तीसाठी सामुहिक प्रयत्न

By admin | Updated: May 11, 2015 00:29 IST

जालना : स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम अंतर्गत जालना जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असून, साधन व्यक्तींनी आपापल्या

जालना : स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम अंतर्गत जालना जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असून, साधन व्यक्तींनी आपापल्या भागात स्वच्छ भारत मिशनचे काम केल्यास जालना जिल्हा राज्यातील पहिला हगणदारीमुक्त होईल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय साधन व्यक्तींच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे केंद्रीय उपसचिव डॉ. निपूण विनायक, जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह, दिल्ली येथील विकास श्रीवास्तव, अप्पर पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, बी.डी. पटेल, नितीन थाडे, पद्माकर केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोणीकर यांनी यावेळी स्वच्छता अभियानात काम कसे करावे, हगणदारीमुक्त गाव करताना काय काळजी घेतली पाहिजे, गतीमान प्रशासन झाल्यास लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळेल व लवकर जिल्हा हगदणदारीमुक्त करण्यासाठी सर्व विभागाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या कार्यशाळेत डॉ. निपूण विनायक यांनी उपस्थित साधन व्यक्तींना हागणदारीमुक्तीबद्दल विविध प्रश्न विचारले. त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थितांनीही उत्स्फुर्तपणे उत्तरे देऊन प्रतिसाद दिला.कार्यशाळेचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. पटेल (पा.व.व्य.) यांनी केले. संचालन भगवान तायड यांनी तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी आभार व्यक्त केले.कार्यशाळेस गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, भास्कर कुलकर्णी, सोळुंके, सुधीर ठोंबरे, दार्इंगडे, बनसोड यांची उपस्थिती होती. कार्यशाळा यशस्वीतेसाठी नम्रता गोस्वामी, भगवान तायड, संजय डोंगरदिवे, सुहास गवळी, हिमांशु कुलकर्णी, जय राठोड, धीरज पाटोळे, संतोष जाधव, श्रीकांत चित्राल, सुशय जाधव, राम चव्हाळ यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)याचा सर्वात जास्त धोका लहान मुलांना असतो. दररोज हजारो मुले देशात डायरिया, हगवणीमुक्त भारतात हे सर्व थांबवणे किती आवश्यक आहे, या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येक तालुकानिहाय प्रतिनिधींची साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली. ४अशा २४० साधन व्यक्तीची कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. या साधन व्यक्तींमार्फत आगामी काळात जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानात डॉ. निपूण विनायक यांनी जे नावलौकिक मिळविले आहे, तो वारसा कायम ठेवून अभियानात उत्कृष्ठपणे काम करू, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना ग्रामसेवक हा या योेजनेचा कणा असून, त्यांना व इतरही विभागांना एक एक करून स्वच्छता अभियानास गती प्राप्त करून देऊ असा विश्वास दिला. कार्यशाळा दोन विभागात संपन्न झाली. प्रात्यक्षिक व मार्गदर्शन असे त्याचे स्वरूप होते. साधन व्यक्तीमध्ये जि.प.सदस्य, रामेश्वर सोनवणे, एल.के. दळवी, पंचायत समिती सदस्य, ब्रह्मा वाघ, पंडितराव भुतेकर, लहुराव देशमुख, संतोषराव मोहिते, राजेश बोराडे, मनिष श्रीवास्तव, संतोष लोखंडे यांनी विविध प्रकारचे अनुभव कथन केले.