आयुक्तांचे पथक तीन दिवस मुक्कामी

By Admin | Updated: August 20, 2015 00:20 IST2015-08-20T00:20:25+5:302015-08-20T00:20:25+5:30

बीड : जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची बिंदू नामावली तपासण्यासाठी आयुक्तांची तीन सदस्यीय समिती बुधवारी येथे धडकली. हे पथक तीन दिवस तळ ठोकणार आहे.

The commissioner's team is scheduled for three days | आयुक्तांचे पथक तीन दिवस मुक्कामी

आयुक्तांचे पथक तीन दिवस मुक्कामी


बीड : जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची बिंदू नामावली तपासण्यासाठी आयुक्तांची तीन सदस्यीय समिती बुधवारी येथे धडकली. हे पथक तीन दिवस तळ ठोकणार आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातून आलेल्या समितीत संजय कुलकर्णी, राहुल बनसोडे, मुकुंद गिरी यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत हजेरी लावून पथकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे जि. प. च्या विविध विभागांच्या बिंदू नामावलीची माहिती मागवली. पहिल्याच दिवशी पंचायत, कृषी, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य या विभागांची बिंदू नामावली तपासण्यात आली. शिक्षण विभागाच्या बिंदू नामावलीवर अतिरिक्त शिक्षकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या विभागाच्या बिंदू नामावलीकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, समितीला कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीराम आघाव, अनिल जाधवर, भगीरथ मस्के, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सूर्यकांत जोगदंड यांनी मागण्यांचे निवेदन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The commissioner's team is scheduled for three days