शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चला.. हवा येऊ द्या !

By admin | Updated: May 19, 2015 00:50 IST

राजेश खराडे , बीड ‘टाईमपास’ या मराठी चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब व अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा ‘चला.. हवा येऊ द्या...’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे

राजेश खराडे , बीड‘टाईमपास’ या मराठी चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब व अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा ‘चला.. हवा येऊ द्या...’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्या हवा सर्वांनाच हवीहवीशी आहे. मात्र, विजेवर चालणारी उपकरणे वापरताना बचतीचा मंत्र जपणे गरजेचे आहे. शासकीय कार्यालयांनी व स्वत: महावितरणने तर वीजबचतीचे भान राखलेच पाहिजे;परंतु आवश्यकता नसताना दिवसभर विविध शासकीय कार्यालयांमधील पंखे, कूलर सुरुच असतात. यामुळे वीज तर वाया जातेच; पण बिलाचा भूर्दंडही सहन करावा लागतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या नादात विजेचा कसा अपव्यय होतो ? हे ‘लोकमत’ने सोमवारी स्टींगमधून समोर आणले.बिले भरण्यात उदासन असलेली प्रशासकिय कार्यालये विजेचा अपव्यय करण्यात आग्रस्थानी आहेत. शहरातील पथदिवेही दिवसभर सुरू राहत असल्याने पथदिव्यांच्या बिलाचा भार सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. विजेचा काटेकोरपणे वापरण्यासंदर्भात कोणतेही गांभीर्यपाळले जात नाही. प्रशासकिय कार्यालयांतील विविध कक्षांमध्ये अधिकारी, कर्मचारी नसतानाही राजेरोसपणे विद्युत उपकरणे चालू ठेवली जात आहेत. बीड विभागाकडे अधिकची थकबाकी असल्याने भारनियमनात वाढ झालेली आहे. थकबाकीनुसार ए.बी.सी.डी.ई.एफ च्या वर्गात भारनियमन केले जात आहे. बीड शहरात १६ फिडर असून त्यापैकी ८ फिडरवर भारनियमन आहे. तर आठ भारनियमनमुक्त . तर ग्रामीण भागात सिंगल फेज असलेल्या ठिकाणी ६ तासाचे तर इतर ठिकाणी आठ तासाचे भारनियमन होत आहे. पब्लिक रिलेशनमुळे प्रशासकिय कार्यालये व पथदिव्यांचे भारनियमन कमी झालेले आहे. मात्र या विभागाकडूनच विजेचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. सातत्याने विजेचे महत्व सांगणाऱ्या विभागीय कार्यालयामधील प्रत्येक विभागात विजेचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले. जालना रोडवरील विभागीय कार्यालयातील तांत्रिक विभागातील भरदुपारच्या वेळीही दिव्यांचा झगमगाट होता. तर पंखे केवळ रिकाम्या खुर्चीना वारा घालत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे कक्षांमध्ये अधिकारी नसतानाही दिवे व पंखे सुरूच होते. एकीकडे ग्राहकांना भारनियमनाचा फटका बसत आहे तर दुसरीकडे प्रशासकिय कार्यालये भारनियमनमुक्त करण्यात आलेले असतानाच त्याचाच गैरफायदा उचलत विद्युत उपकरणे बंद करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.