शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांचे अहवाल मागविणार

By admin | Updated: April 16, 2015 01:01 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किती पात्र प्राध्यापक नियुक्त केलेले आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किती पात्र प्राध्यापक नियुक्त केलेले आहेत. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता किती आहे, यासंबंधीचा अहवाल तातडीने मागविला जाणार असल्याची माहिती ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी दिली.चार दिवसांपूर्वी मुंबईत मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने राज्यातील कुलगुरू, ‘बीसीयूडी’चे संचालक, यूजीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयीन स्तरावर ‘चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम’ची अंमलबजावणी करण्याबाबत विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यासंदर्भात ‘बीसीयूडी’चे संचालक यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यापूर्वीच संलग्नित महाविद्यालयांनाही ‘चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम’ लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधी कार्यवाही सुरू आहे. लवकरच महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरावरील पदव्युत्तर अभ्यासक्रम एकच राहील. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाचा आराखडा ठरविण्यासाठी लवकरच बैठक बोलावली जाईल. डॉ. काळे यांनी सांगितले की, आता ‘चॉईस बेस्ड के्रडिट सिस्टीम’पासून कोणाचीही सुटका नाही. संलग्नित महाविद्यालयांना ही सिस्टीम लागू करावीच लागेल. अन्यथा भविष्यात ‘यूजीसी’च्या अनुदानापासून महाविद्यालयांना वंचित राहावे लागेल. यासाठी अगोदर विषयनिहाय पात्र प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविल्या जाणाऱ्या महाविद्यालयांमध्ये किती पात्र प्राध्यापक कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता किती आहे, याचा गोषवारा मागविण्यात येणार आहे.