शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 22:59 IST

हिंगोली : शहरातील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे १५ ते १७ फेबु्रवारीदरम्यान घेतलेल्या जिल्हा ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.

हिंगोली : शहरातील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे १५ ते १७ फेबु्रवारीदरम्यान घेतलेल्या जिल्हा ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. याप्रसंगी प्रमाणपत्र वितरण, व्याख्यान, तसेच विद्यार्थ्यांनी कथा-कथन व काव्यवाचन केले.अशोक अर्धापूरकर, प्रमुख वक्ते उत्तम सूर्यवंशी, प्रमोद पाटील, खंडेराव सरनाईक, विजय हवालदार, प्रा. जी. पी. मुपकलवार, सुभाष साबळे, जया करडेकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रथम उत्तम सूर्यवंशी यांनी वाचन संस्कृतीवर व्याख्यान दिले. ते म्हणाले, ग्रंथाशिवाय मन तयार होत नाही; त्यामुळे वाचनसंस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले, माणसाच्या जीवनामध्ये विचार करणे हेच जिवंतपणाचे लक्षण असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि.रा. शिंदे व यशवंतराव चव्हाण आदींची उदाहरणे देत स्पष्ट करून दाखविले. तसेच विद्यार्थ्यांनी कथा-कथन व काव्यवाचन केले. यावेळी अंजली जावळे हिने मुलींनी जगावे तरी कसे? ही कविता सादर केली. तर कोमल बांगर हिने आई आपल्या मुलाला गरिबीमध्ये जगणे कशाप्रकारे शिकवते याविषयी काव्यकथन केले. तसेच प्रदीप बनसोडे, अदित्य जाधव, मोहन पांचाळ, आदित्य राखुंडे, प्रदीप बनसोडे यांच्यासह सहभागी विद्यार्थ्यांनी विविध काव्यवाचन व कथाकथन करून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अर्धापूरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ग्रंथाशिवाय माणूस घडणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथ आणि ग्रंथालय कपाट असणे आवश्यक आहे. सयाजीराव गायकवाड यांनी गाव तेथे गं्रथालये ही संकल्पना मांडली होती. परंतु सध्या असे चित्र दिसून येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रा.विलास वैद्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. ग्रंथालय संघातर्फे यासाठी परिश्रम घेण्यात आले. (प्रतिनिधी)