शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

‘दानपत्र’च्या जागांवर दावा

By admin | Updated: June 25, 2014 01:26 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी दान मिळालेल्या जमिनींवर जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्र आणि शाळांच्या इमारती बांधल्या असल्या, तरी त्यातील अनेक जागा स्वत:च्या नावावर करून घेतलेल्या नाहीत.

औरंगाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी दान मिळालेल्या जमिनींवर जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्र आणि शाळांच्या इमारती बांधल्या असल्या, तरी त्यातील अनेक जागा स्वत:च्या नावावर करून घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आता काही जागा जिल्हा परिषदेच्या हातून निघून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत दोन आरोग्य केंद्रांच्या जागा परत देण्याची मागणी मूळ मालकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे, तर एका ठिकाणी शाळेच्या इमारतीचाच ताबा घेण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्रांसाठी स्थानिक नागरिकांकडून तसेच ग्रामपंचायतींकडून जागा दानपत्र करून घेण्यात आलेल्या आहेत. सध्या या जागांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि शाळांच्या इमारती उभ्या आहेत. मात्र, यातील अनेक जागा स्वत:च्या नावावर करून घेण्याची काळजी प्रशासनाने घेतलेली नाही. अलीकडच्या काळात जागांच्या किमती वाढल्यामुळे आणि संबंधित जागा अजूनही मूळ मालकाच्या नावावर असल्यामुळे दानशूर पुत्रांनी त्यावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला सिल्लोड तालुक्यातील लिहा येथील एका शाळेची इमारत मूळ मालकाने ताब्यात घेतली होती. त्यानंतर पिंप्र्रीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवरही मूळ मालकाने दावा सांगितला आहे. आता लाडसावंगी येथील आरोग्य केंद्राच्या जागेवर मूळ मालकाच्या वारसांकडून दावा सांगितला गेला आहे. विशेष म्हणजे या जागांचे दानपत्रही जिल्हा परिषद प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत. जिल्हा परिषद कार्यालयातून दानपत्रांचे रेकॉर्डही गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या जागा हातून निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. (लोकमत ब्युरो)प्रशासन हलेनास्थायी समितीच्या बैठकीत महिनाभरापूर्वी लिहा येथील शाळेचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या जागांचे रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना दिल्या, तसेच ज्या जागा अद्याप नावावर झालेल्या नसतील त्या नावावर करून घेण्याची कार्यवाही सुरू करावी, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. महिना उलटला तरी गंभीर विषयावर प्रशासनाने कार्यवाही सुरू केलेली नाही. अजूनही रेकॉर्डची शोधाशोध करण्याचेच काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.