शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

शहराने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: May 27, 2014 00:58 IST

उस्मानाबाद : सोमवारी सकाळी अतिक्रमण विरोधी पथक जिल्हा परिषदेसमोरील मुख्य रस्त्यावर दाखल झाले. आणि काही वेळातच वर्षानुवर्ष मुख्य रस्ता गिळंकृत केलेल्या अतिक्रमणावर बुलडोझर सुरु झाला.

उस्मानाबाद : सोमवारी सकाळी अतिक्रमण विरोधी पथक जिल्हा परिषदेसमोरील मुख्य रस्त्यावर दाखल झाले. आणि काही वेळातच वर्षानुवर्ष मुख्य रस्ता गिळंकृत केलेल्या अतिक्रमणावर बुलडोझर सुरु झाला. प्रशासनाने दिवसभरात सुमारे अडीचशेपेक्षा जास्त अतिक्रमणे हटविली असून, शहराच्या अन्य भागात ही मोहीम उद्या मंगळवारीही सुरु राहणार आहे. प्रशासनाच्या या ठोस कारवाईमुळे शहरातील या मुख्य रस्त्याने खर्‍या अर्थाने मोकळा श्वास घेतला. शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झाले होते. या अनुषंगाने प्रशासनाने वेळोवेळी संबंधितांना नोटीसही बजावली होती. मात्र याकडे अतिक्रमणधारकांनी कानाडोळा केला. त्यानंतर रविवारी बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावली. बंद असलेल्या दुकानावरही याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सोमवारी सकाळीच अतिक्रमणविरोधी पथक जिल्हा परिषदेसमोर दाखल झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात होता. तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी शहरांसोबत ग्रामीण भागातील अतिक्रमणे हटविण्याबाबत नगर पालिका, तहसील प्रशासन, तसेच बांधकाम विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, शिवाजी चौक, सांजा रोड आयुर्वेदीक महाविद्यालया पर्यंतची सुमारे २५० अतिक्रमणे सोमवारी हटविण्यात आली आहेत. पथक आल्याचे समजताच काहींनी स्वताहून अतिक्रमण अतिक्रमणे काढली. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंते, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) बार्शी नाका भागात आज मोहीम जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरुन सुरु झालेली ही कारवाई मंगळवारीही सुरु राहणार आहे. मंगळवारी शहरातील बार्शी नाका येथील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. अतिक्रमण हटविल्याने या मुख्य मार्गावर होणारी रहदारीची कोंडी कमी होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर अतिक्रमणधारकांनी या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करीत प्रशासनाने बेरोजगारांसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता व्यक्त केली. तुळजापुरातही अतिक्रमणे जमीनदोस्त तुळजापूर : अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत सोमवारी न.प., महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे बसस्थानक परिसर, बसस्थानक रस्ता, भवानी रोड, दिपक चौक या परिसरातील कच्चे व पक्के अतिक्रमण हटविले. भवानी रोडवर दुकानदारांनी सावलीसाठी लावलेले पत्रे, जवाहर चौकासमोरील बीडकर तलावातील बोळातील, भाजीमंडई ते महाद्वार रस्ता या परिसरातील सर्व अतिक्रमणे आज हटविण्यात आली. मुख्याधिकारी राजीव बुबणे, अभियंता अशोक जगदाळे, अभियंता चव्हाण, स्वच्छता निरीक्षक शेख, अभियंता ढोबळे, तहसीलदार काशीनाथ पाटील, नायब तहसीलदार वाघे, पीएसआय चौधरी यांच्यासह न.प. कर्मचारी, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसस्थानक रस्त्यावर अतिक्रमण पथक आल्याचे समजताच भवानी रोडवर अतिक्रमणे केलेल्या व्यापार्‍यांनी आपापले अतिक्रमण स्वत:हून तात्काळ हटविले.