शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बीड शहर पाच तास अंधारात

By admin | Updated: April 8, 2016 00:28 IST

बीड : ढगाळ वातावरण आणि वाऱ्याला सुरूवात होताच शहरातील वीज गायब होणार याची धास्ती नागरिकांना कायम आहे. सध्या बीड विभाग भारनियमनमुक्त

बीड : ढगाळ वातावरण आणि वाऱ्याला सुरूवात होताच शहरातील वीज गायब होणार याची धास्ती नागरिकांना कायम आहे. सध्या बीड विभाग भारनियमनमुक्त असतानाही दिवसकाठी ४ ते ५ तास वीज गायब असल्याने नागरिक त्रस्त आहेत. धानोरा रोडवरील उपकेंद्रातील स्प्रिंग चार्ज नसल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला होता. त्यामुळे बीडकरांना सबंध रात्र जागून काढावी लागली होती. ग्रामीण भागाबरोबरच शहरातीलही महावितरणची दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. त्यामुळेच वाऱ्याला आणि पावसाला सुरूवात होताच वीज गायब होणार हा अलिखित नियम झाला आहे. असे असतनाही विभागाकडून दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. कंत्राटदारांची बिले रखडल्याने दुरूस्ती कामे देणेही अवघड झाले आहे. त्यामुळे लहान-मोठ्या अडचणीमुळे शहरातील वीजपुरवठा तासन्तास खंडित करण्याची नामुष्की येत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात व परिसरात अवकाळी पाऊस होत आहे. वाऱ्यामुळे जागोजागी विद्युत तारांवर झाडाच्या फांद्या पडत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. वर्षभरापासून निधीअभावी महावितरणची दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. गत महिन्यात वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांच्या दारी खेटे मारणारे हेच अधिकारी - कर्मचारी आज अरेरावीची भाषा करीत आहेत. दुरूस्तीच्या कामावर अधीक्षक अभियंता यांचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचा कडाका आणि त्यातच वीज गायब असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अधिकच्या कामाचा भार येथील कर्मचाऱ्यावर असल्याने सेवेवरही परिणाम होत आहे. एका वायरमनकडे तब्बल १० ते १५ रोहित्रांचा भार आहे. क्षुल्लक कारणांसाठी शहरात वीजपुरवठा खंडित होत आहे. याचे गांभीर्य ना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे ना कंत्राटदारांना, ग्राहक मात्र त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)