शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शहर बसअभावी नागरिकांची पायपीट

By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST

वाळूज महानगर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलवाडीत शहर बसची सोय नसल्याने गोलवाडीवासीयांना दररोज दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

वाळूज महानगर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलवाडीत शहर बसची सोय नसल्याने गोलवाडीवासीयांना दररोज दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. शहर बस सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावाला एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असूनही गोलवाडी विकासापासून कोसो दूर आहे. साधी शहर बसची सुविधा नाही. नागरिकांना दररोज दोन कि़ मी. गोलवाडी फाट्यापर्यंत पायपीट करावी लागते. येथेही बस थांबेल की नाही याची खात्री नाही. गावातील ३५ पेक्षा अधिक विद्यार्थी शहरात शिक्षण घेतात. सर्वांनी बसचे पास काढले आहेत. परंतु गावात शहर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना रोज गाव ते औरंगाबाद- नगर रस्ता, असा पायी प्रवास करतच ये-जा करावी लागत आहे. बहुतांशी बस बजाजनगर, पंढरपूर येथूनच भरून येतात. त्यामुळे बसचालक गोलवाडी फाट्यावर बस उभी न करता निघून जातात. महिन्याचा बस पास असूनही खाजगी वाहनाने ये-जा करावी लागत असल्याने अधिकचा भुर्दंडही विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. खाजगी वाहनांच्या असुरक्षित प्रवासामुळे मुलींना शाळेत पाठवायला बहुतांशी पालक असमर्थता दाखवत आहेत. वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तास बुडत असून, नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय व शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने १९ आॅगस्टला एस. टी. महामंडळाला पत्र देऊन गोलवाडी ते औरंगपुरा शहर बस सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु एस. टी. महामंडळाने ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. एस. टी. महामंडळाने गोलवाडीसाठी स्वतंत्र शहर बस सुरू करावी, अशी मागणी सरपंच सुभान शेख, उपसरपंच यमुना धोंडरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जैस्वाल, शांताबाई कीर्तिशाही, केरुबा कसारे, आरती सलामपुरे, छगन सलामपुरे, किसन धांडे, गंगाराम कणसे, प्रभात तिरछे, आकाश सलामपुरे, शामा केवट, धोंडिराम सलामपुरे, अजय चौधरी, राजू सलामपुरे, सीता तिरछे, कमलेश सलामपुरे आदी गावकऱ्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोलवाडी ग्रामपंचायतीचे आलेले पत्र तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.