मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले; इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:21 IST2026-01-25T12:19:57+5:302026-01-25T12:21:29+5:30

Girls Hostel Video Leak: छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात घडलेली घटना प्रत्येकीसाठी डोळे उघडणारी आहे. एका तरुणीने आपल्याच रूममेटचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूट करून आपल्या प्रियकराला पाठवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

chhatrapati Sambhajinagar Shocking News Engineering Student Records Roommate Undressing, Sends Videos to Boyfriend | मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले; इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहातील घटना

मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले; इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहातील घटना

छत्रपती संभाजीनगरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणीने आपल्याच सोबत रूममध्ये राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे गुपचूप व्हिडिओ शूट करून ते आपल्या प्रियकराला पाठवले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात आरोपी तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी तरुणी या दोघीही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असून महाविद्यालयाच्या वसतिगृहात एकाच रूममध्ये राहतात. १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकरासोबत फोनवर बोलत होती. यावेळी ती फोनवर फोटो कसे वाटले? हॉट आहेत का? असे संशयास्पद बोलत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. मैत्रिणीच्या संशयास्पद बोलण्यामुळे पीडितेने तिला रंगेहाथ पकडले आणि तिचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासला. मोबाईलमधील गॅलरी आणि चॅट्स पाहिल्यानंतर पीडितेच्या पायाखालची जमीनच सरकली. आरोपी तरुणीने पीडितेचे कपडे बदलतानाचे खासगी व्हिडिओ काढले आणि ते सर्व व्हिडिओ तिचा प्रियकर स्वराज धालगडे याला पाठवले.

यानंतर पीडित तरुणीने तातडीने सिडको पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज या दोघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून वसतिगृहातील तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी कोणाचे व्हिडिओ अशा प्रकारे शूट केले आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे.

Web Title : इंजीनियरिंग छात्रा ने रूममेट का वीडियो बनाकर प्रेमी को भेजा।

Web Summary : एक चौंकाने वाली घटना में, एक इंजीनियरिंग छात्रा ने अपनी रूममेट का गुप्त रूप से वीडियो बनाया और उसे अपने प्रेमी को भेज दिया। पीड़िता की शिकायत के बाद पुलिस ने दोनों के खिलाफ मामला दर्ज किया, जिससे कॉलेज छात्रावासों में सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।

Web Title : Engineering student secretly films roommate, sends videos to boyfriend.

Web Summary : In a shocking incident, an engineering student filmed her roommate changing and sent the videos to her boyfriend. Police have registered a case against both individuals following the victim's complaint, raising concerns about safety in college hostels.