छ. संभाजीनगरात ACB सापळा! भर हॉटेलमध्ये १० हजार स्वीकारले अन् ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:45 IST2026-02-25T15:44:05+5:302026-02-25T15:45:01+5:30

बिल मंजूर केल्याचं 'बक्षीस' मागितलं; १० हजार स्वीकारताना ग्रामसेवक राजोबा काथार रंगेहाथ अटक

Chhatrapati Sambhajinagar ACB Trap: Gram Sevak Caught Red-Handed by ACB in Chhatrapati Sambhajinagar Hotel while taking 10 thousand rupees bribe | छ. संभाजीनगरात ACB सापळा! भर हॉटेलमध्ये १० हजार स्वीकारले अन् ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

छ. संभाजीनगरात ACB सापळा! भर हॉटेलमध्ये १० हजार स्वीकारले अन् ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

छत्रपती संभाजीनगर: पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनाचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात 'बक्षीस' म्हणून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रहाळपट्टी तांडा (जटवाडा) येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. टीव्ही सेंटर चौकातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी हा थरार घडला. राजोबा विठोबा काथार (५०, रा. वसननगर, जाधववाडी) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

नेमके प्रकरण काय?
तक्रारदार कंत्राटदाराने रहाळपट्टी येथे ग्रामनिधी योजनेंतर्गत पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल ग्रामसेवक काथार याने मंजूर करून कंत्राटदाराला दिले होते. मात्र, बिल अदा केल्याचे बक्षीस म्हणून काथार याने कंत्राटदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

हॉटेलमध्ये रचला सापळा
एसीबीने १६ फेब्रुवारी रोजी केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार, मंगळवारी टीव्ही सेंटर येथील एका हॉटेलमध्ये एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ग्रामसेवक काथार तेथे आला आणि पंचांसमक्ष १० हजार रुपये स्वीकारले. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला जाळ्यात ओढले.

घराचीही घेतली झडती
या कारवाईनंतर पोलिसांनी ग्रामसेवक काथार याच्या जाधववाडी येथील घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शांतीलाल चव्हाण अंमलदार रवींद्र काळे, अशोक नागरगोजे, विलास चव्हाण आणि रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक राजू नागलोत करत आहेत.

Web Title : संभाजीनगर में एसीबी का जाल: रिश्वत लेते ग्राम अधिकारी गिरफ्तार

Web Summary : संभाजीनगर में एसीबी ने एक ग्राम अधिकारी को होटल में 10,000 रुपये की रिश्वत लेते हुए रंगे हाथों पकड़ा। उसने पानी की आपूर्ति और कचरा प्रबंधन बिलों को मंजूरी देने के लिए रिश्वत मांगी थी। अधिकारी राजोबा काथर को गिरफ्तार कर लिया गया है, और उसके घर की तलाशी जारी है।

Web Title : ACB Trap in Sambhajinagar: Village Officer Arrested Accepting Bribe

Web Summary : A village officer in Sambhajinagar was caught red-handed by ACB while accepting ₹10,000 bribe at a hotel. He demanded the bribe for approving water supply and waste management bills. The officer, Rajoba Kathar, is now arrested, and his house is being searched.