पोलिसांना चापट मारली अन् दारुडा रस्त्यावरच झोपला; छ. संभाजीनगरात दांपत्यवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:23 IST2026-02-23T13:21:40+5:302026-02-23T13:23:11+5:30

"दोन दिवसात बघून घेतो..." पोलिसांना धमकी देत दांपत्याची धक्काबुक्की; दामिनी पथकाने आवळल्या मुसक्या

Chh. Sambhajinagar Crime: Drunk Man and Wife Assault Traffic Police at High Court Signal | पोलिसांना चापट मारली अन् दारुडा रस्त्यावरच झोपला; छ. संभाजीनगरात दांपत्यवर गुन्हा दाखल

पोलिसांना चापट मारली अन् दारुडा रस्त्यावरच झोपला; छ. संभाजीनगरात दांपत्यवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नलवर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना एका दारुड्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार रविवारी दुपारी ४.३० वाजता घडला. या प्रकरणी पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

सोमनाथ मुरलीधर गिरी (२७) आणि अनिता सोमनाथ गिरी (२५, मूळ रा. चांदानगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, ह.मु. गल्ली नं.१, विजयनगर) अशी आरोपी पती-पत्नीची नावे आहेत. पोलिस कर्मचारी रावसाहेब पचलोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस कर्मचारी संतोष खरात यांच्यासह ते हायकोर्ट सिग्नल चौकात वाहतुकीचे नियमन करीत होते. दुचाकीचास्वार (एमएच १७ सीक्यू ६७४२) सोमनाथ हा डिव्हायडर जवळून गाडी चालवत होता. त्यास थांबवल्यावर तो दारू पिल्याचे आढळून आले. त्याची चौकशी सुरू केल्याने त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात व शिवीगाळ सुरू केली. तुम्हाला दोन दिवसात बघून घेतो अशी धमकीही दिली. तसेच खरात यांच्या अंगावर हात उचलला. त्यानंतर त्याने पत्नीला बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर दोघांनी वाद सुरू केला. शिवीगाळ करीत लोटालोट केली. त्याचवेळी फिर्यादीच्या गालावर चापट मारली. आरोपी सोमनाथ हा रस्त्यावर जाऊन झोपला. त्यामुळे वाहतुकीला मोठा आडथळा निर्माण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपींना घेतले ताब्यात
पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती देऊन दामिनी पथकाची मागणी केली. रस्त्याने जाणाऱ्यांनीही पती-पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिस मदत आल्यानंतर दोघांना ताब्यात घेत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणले व त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Web Title : शराबी ने पुलिसकर्मी को थप्पड़ मारा, सड़क पर सोया; दंपती पर मामला दर्ज।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में, शराब पीकर गाड़ी चलाने पर रोके जाने पर एक शराबी ने यातायात पुलिस पर हमला किया। सड़क पर हंगामा करने और सोने से यातायात बाधित करने के बाद उसे और उसकी पत्नी को गिरफ्तार किया गया।

Web Title : Drunk man slaps cop, sleeps on road; couple booked.

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, a drunk man assaulted traffic police after being stopped for drunk driving. He and his wife were booked after creating a scene and obstructing traffic by sleeping on the road.