Chhatrapati Sambhajinagar Traffic Update:: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शहरातील विविध भागांत मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुका सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहेत. तसेच १८ फेब्रुवारी रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी क्रांती चौकात नागरिक एकत्र येतात. त्यामुळे १८ व १९ फेब्रुवारी रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
आज याठिकाणी होणार बदल१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत गोपाल टी पॉइंट ते सिल्लेखाना चौक आणि क्रांती चौक उड्डाणपूल पूर्व बाजू सर्व्हिस रोड ते क्रांती चौक उड्डाणपूल पश्चिम बाजू सर्व्हिस रोड हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यास पर्यायी मार्गाचा वापर वाहन चालकांना करावा लागणार आहे.
उद्या याठिकाणी होणार बदल१९ फेब्रुवारीला सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत राजा बाजार चौक-संस्थान गणपती-शहागंज-सिटी चौक-गुलमंडी-पैठण गेट- सिल्लीखाना-क्रांती चौक गोपाल टी, सिडको एन-१२ नर्सरी-टीव्ही सॅन्टर-जिजाऊ चौक- एम-२- एन-९- शिवनेरी कॉलनी- पार्श्वनाथ चौक- बळीराम पाटील चौक-बजरंग चौक-आविष्कार चौक शिवाजी महाराज पुतळा-चिस्तिया चौक आणि जयभवानीनगर चौक गजानन महाराज मंदिर व सेव्हन हिल उड्डाणपूल-आदिनाथ चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील. त्यास असलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.