शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरात आयसीयूमध्ये एसीचा भडका अन् रुग्णांची पळापळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:30 IST

सायरन वाजताच काही क्षणांत सर्वत्र धूर, गजानन महाराजांच्या कृपेने आम्ही वाचलो

छत्रपती संभाजीनगर : जेवण करण्यासाठी डबा उघडला, तोच सायरन वाजला. आग लागली, बाहेर पडा, असे रुग्णालयातील कर्मचारी जोरजोराने ओरडू लागले. काही क्षणांत धूर पसरला. जेवणाचा डबा तसाच सोडून उपचारासाठी दाखल पतीला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून कसेबसे रुग्णालयाबाहेर पडले. गजानन महाराजांच्या कृपेनेच आम्ही वाचलो, अशी भावना व्यक्त करीत सुमनबाई चाटूपळे यांनी गजानन हाॅस्पिटलमधील थरारक अनुभव ‘लोकमत’शी बोलताना उलगडला.

सुमनबाई चाटूपळे यांचे पती पंडित बापूराव चाटूपळे (रा. पैठण) यांचे चार दिवसांपूर्वी या हाॅस्पिटलमध्ये काखेतील गाठीवर शस्त्रक्रिया झाली. त्यांच्यावर तिसऱ्या मजल्यावरील वाॅर्डात उपचार सुरू होते. अचानक सायरन वाजला. लगेच रुग्णालयात आग लागल्याचे कळले. जेवणाला बसण्याआधीच हाताची सलाईन काढण्यात आलेली होती. त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर वेळीच बाहेर पडता आले, असे पंडित चाटूपळे यांनी सांगितले. चाटूपळे यांच्यासह दहारुग्णांना उपचारासाठी जालना रोडवरील वैद्यनाथ हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. येथे डाॅ. संदीप सानप यांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.

वडील ‘आयसीयू’त, ‘एसी’जवळ आग, लगेच भडकामाझे वडील फरीद चांद पटेल (रा. नांदगाव, नाशिक) यांच्यावर चार दिवसांपासून दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूत उपचार सुरू होते. आयसीयूत असताना अचानक एसीजवळ आग लागली. काही वेळातच भडका उडाला आणि आग अधिक पसरली. अवघ्या १५ मिनिटांत वडिलांना रुग्णवाहिकेने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.- साहिल फरीद पटेल, रुग्णाचा मुलगा

कसेबसे खाली उतरलोदम्याच्या त्रासामुळे पती कांतीलाल दायमा (नांदगाव, नाशिक) यांना घेऊन आजच गजानन हाॅस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. त्यांना दम्याचा त्रास आहे. आगीची घटना घडल्यानंतर आम्ही कसेबसे खाली उतरलो आणि दुसऱ्या रुग्णालयात आलो.- लताबाई दायमा, रुग्णाची पत्नी

खिडकीतून धूररात्री ७:४५ ला रुग्णालयाच्या खिडकीतून धूर आला. तेव्हा ‘एसी’जवळून आग सुरू झाल्याचे समजले. काही वेळातच रुग्णांना रुग्णवाहिकेतून अन्यत्र हलविले. खिडकीतून खूप धूर येत होता.- अरुण चव्हाण, प्रत्यक्षदर्शी

त्रुटी असणाऱ्यांना नाेटीसगजानन हाॅस्पिटलमधील १० रुग्ण अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयाकडे फायर एनओसी, यंत्रणा आहे. आगीच्या घटना घडू नये, या दृष्टीने रुग्णालयांची आधीच तपासणी सुरू केली आहे. त्रुटी आढळलेल्या दोन ते तीन रुग्णालयांना नोटीस बजावल्या आहेत.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

१० दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने वेधले होते लक्षओडिशातील कटक येथील ट्रॉमा आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ‘लोकमत’ने १९ मार्चला ‘जेव्हा रुग्णालयात लागते आग, तेव्हाच सरकारी यंत्रणेला जाग’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करीत रुग्णालयांच्या स्थितीकडे लक्ष वेधले होते. अनेक रुग्णालयांनी अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्याची कागदपत्रे यंत्रणेला सादर केलेली नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. त्यातून अशा घटनांची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : ICU AC Fire in Chhatrapati Sambhajinagar: Patients Fled in Panic

Web Summary : A fire erupted in the ICU of a Chhatrapati Sambhajinagar hospital due to an AC unit, causing panic and evacuation. Patients were moved to other hospitals. Negligence regarding fire safety has been highlighted.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलfireआग