शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने केली निम्न दूधनाची पाहणी

By admin | Updated: December 16, 2015 23:31 IST

परभणी : दिल्ली येथे केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने सोमवारी जिल्ह्यातील निम्न दूधना प्रकल्पाची पाहणी करून रखडलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिले़

परभणी : दिल्ली येथे केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने सोमवारी जिल्ह्यातील निम्न दूधना प्रकल्पाची पाहणी करून रखडलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिले़ पथकाच्या भेटीमुळे निधी उपलब्ध होऊन प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागेल, असा आशावाद निर्माण झाला आहे़ पंतप्रधान सिंचाई लाभ योजनेत देशभरातील २३ पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ त्यात राज्यातील ७ आणि परभणी जिल्ह्यातील सेलू येथील निम्न दूधना प्रकल्पाचा समावेश आहे़ त्यामुळे १४ डिसेंबर रोजी या पथकाने निम्न दूधना प्रकल्पास भेट देऊन डावा व उजवा कालव्याचे काम आणि धरण कामाची पाहणी केली़ या पथकामध्ये दिल्ली येथील केंद्रीय जल आयोगाचे मूल्यांकन संचालक बी़ के ़ कारजी, नागपूर कार्यालयाचे संचालक आऱ डी़ देशपांडे यांचा समावेश होता़ निम्न दूधना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता एऩ व्ही़ शिंदे, कार्यकारी अभियंता डी़ बी़ पांडे, आऱ बी़ सोमवंशी, शाखा अभियंता मंगल पांडे यांनी प्रकल्पाविषयी पथकाला माहिती दिली़ सध्या दुष्काळी परिस्थिती असून, प्रकल्पातील पाण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले़ त्यावर पथकाने समाधान व्यक्त केले़ यावेळी झरी येथील प्रगतीशील शेतकरी कांतराव देशमुख यांनीही विशेष पथकाची भेट घेऊन हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली़ सदरील प्रकल्प मार्च २०१७ पर्यंत पूर्ण होणे शक्य असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)