पोळा सण उत्साहात

By Admin | Updated: September 13, 2015 00:07 IST2015-09-12T23:45:24+5:302015-09-13T00:07:56+5:30

बीड : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी बळीराजाने सर्जा-राजाचा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ग्रामीण भागाबरोबरच शहरातही

Celebrate the Pala festival | पोळा सण उत्साहात

पोळा सण उत्साहात


बीड : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी बळीराजाने सर्जा-राजाचा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ग्रामीण भागाबरोबरच शहरातही बैल-जोडीची ठिकठिकाणाहून मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करीत मराठमोळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला.
कायमस्वरूपी शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या बैलजोडीचा पोळा हा एकमेव सण साजरा केला जातो. शनिवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोळ्याची तयारी सूरू केली होती. जनावरे धुऊन मोठ्या उत्साहात बैल जोड्या रंगवण्यात आल्या होत्या. दिवसभर जनावरांच्या मिरवणूका काढून सायंकाळी रुढी परंपरेने बैलांचे लग्न लावून हा सण साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Celebrate the Pala festival