शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

३५ चौकांमध्ये बसविणार ‘सीसीटीव्ही’

By admin | Updated: August 29, 2014 01:28 IST

जालना : शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीने विविध ३५ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा श्रीगणेशा

जालना : शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीने विविध ३५ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा श्रीगणेशा २९ आॅगस्ट रोजी होत आहे. एकाच दिवशी हे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सूचनेनुसार कॅमेरे बसविण्यात येत आहेत. पालिकेने खर्चाचा भार उचलला असला तरी नियंत्रण पोलिसांकडेच राहणार आहे. रेल्वेस्थानक, बस स्थानक, गांधी चमन, मोतीबाग, सिंधीबाजार, शिवाजी पुतळा, बाबुराव काळे चौक, गुरूबचन चौक, जिजामाता कमान, घनतृप हनुमान चौक, टांगा स्टॅण्ड, सराफा मार्केट, मंमादेवी चौक, शनी मंदिर जुना जालना, बडीसडक राम मंदिर, मुर्गी तलाब, दुर्गा माता/झाशी राणी पुतळा, महावीर चौक, सुभाष चौक, भोकरदन नाका, कन्हैय्यानगर, मंठा नाका, दत्त आश्रम आदी चौकांची निवड करण्यात आली आहे. यासाठी वाय-फाय यंत्रणा असणार असल्याने कोठेही वायर दिसणार नाही. चौकात बसविल्यानंतर संपूर्ण चौक संरक्षित होऊ शकेल, एवढी खांबाची उंची राहील. वॉटर प्रुफ कॅमेरे १.३ मेगा फिक्सल शक्तीचे राहतील. तसेच आय.सी. म्हणजे इंटरॉक्ट प्रोटोकॉल स्टीमचे कॅमेरे आहेत. त्याचे नियंत्रण पोलिस अधीक्षक, सदर बाजार, कदीम जालना, नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि दहा जणांच्या समिती सदस्यांच्या मोबाईलवर इंटरनेटद्वारे जोडले जातील. शहरात मागील काही काळात रस्त्यावर खून, प्राणघातक हल्ले, चोऱ्या, लुटमार यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ऐन उत्सव काळात या कॅमेऱ्यांची पोलिस प्रशासनास मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सूचनेनुसार कॅमेरे बसविण्यात येत आहेत. पालिकेने खर्चाचा भार उचलला असला तरी नियंत्रण पोलिसांकडेच राहणार आहे. या निर्णयाचे जानलेकरांतून स्वागत होत आहे. कॅमेरे कायमस्वरुपी ठेवण्याची मागणी आहे.