अजाण सुरु असताना उपनिरीक्षकानेच लावले मोठ्या आवाजात गाणे, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 06:38 PM2022-04-25T18:38:17+5:302022-04-25T18:41:00+5:30

रेल्वे सुरक्षा बलमध्ये पोलीस उपनिरीक्षकच्या जबाबदार पदावर असताना कायद्याचे उल्लंघन

case filed against the railway sub-inspector who plays song loudly When it started Ajan at mashid | अजाण सुरु असताना उपनिरीक्षकानेच लावले मोठ्या आवाजात गाणे, गुन्हा दाखल

अजाण सुरु असताना उपनिरीक्षकानेच लावले मोठ्या आवाजात गाणे, गुन्हा दाखल

googlenewsNext

औरंगाबादेत : अजाण सुरू असताना एका पोलीस उपनिरीक्षकाने मोठ्या आवाजात गाणे लावल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, हे कृत्य करणारा रेल्वे पोलिसात उपनिरीक्षक या जबाबदार पदावर आहे. 

रेल्वे पोलिसात उपनिरीक्षक किशोर गडप्पा मलकूनाईक अस गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. उपनिरीक्षक मलकूनाईक सातारा परिसरातील अमृतसाई इमारतीत राहतात. त्यांनी शनिवारी सायंकाळी राहत्या घराच्या मागे असणाऱ्या मशीदच्या दिशेने नमाज पठन करण्याच्या वेळी लाऊड स्पिकरवर ठेवून मोठ्या आवाजात गाणे लावले. त्या भागातील नागरिकांनी याबाबत नियंत्रण कक्षात तक्रार दिली. त्यावरून पोउपनि सोनवणे यांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि कराळे करत आहेत. 

रेल्वे सुरक्षा बलमध्ये पोलीस उपनिरीक्षकच्या जबाबदार पदावर असताना सुद्धा त्यांनी घराच्या मागे असलेल्या मशीदच्या दिशेने नमाज पठन सुरु असताना मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर गाणे लावले. यातून 2 धर्मात तेढ निर्माण होऊ शकते आणि वेगवेगळ्या गटात शत्रुत्व वाढू शकते , त्यामुळ ही क्रिया चिथावणीखोर असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आदेश क्र.जा क्र विशा-4/आदेश/औ बाद/ 2022-1575 औरंगाबाद दि. 22/04/2022 अन्वये प्राप्त आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37(1) व (3) चे उल्लंघन केले.  त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

Web Title: case filed against the railway sub-inspector who plays song loudly When it started Ajan at mashid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.