शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

‘औरंगाबाद’साठी निघाला कँडल मार्च; खासदार इम्तियाज जलील यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:53 IST

‘औरंगाबाद था, है, रहेगा, आय लव्ह औरंगाबाद’ अशा घोषवाक्याचे फलक मार्चमध्ये धरण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर : नामांतरविरोधी कृती समितीतर्फे गुरुवारी रात्री निघालेल्या कँडल मार्चला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषत: या मार्चमध्ये मुस्लीम महिलांची लक्षणीय उपस्थिती राहिली. खा. इम्तियाज जलील यांनी या मार्चचे नेतृत्व केले. दरम्यान, जमावबंदी असताना विनापरवानगी मोर्चा काढल्याने खा. इम्तियाज जलील यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काही दिवसांपासून या समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच कँडल मार्चला प्रारंभ झाला. तो भडकल गेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला व तेथे मार्चाची सांगता झाली व बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या मार्चमध्ये सहभागी झालेले पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले व तेथे सभा झाली.

औरंगाबाद था, है, रहेगा, आय लव्ह औरंगाबाद’ अशा घोषवाक्याचे फलक मार्चमध्ये धरण्यात आले होते. कँडल व मोबाइलच्या बॅटऱ्यांच्या प्रकाशात निघालेल्या या मार्चमध्ये कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. नामांतराच्या प्रश्नावर मतदान घ्यावे. त्यातून जो निकाल येईल, तो आम्हाला मान्य राहील, अशी भूमिका यावेळी जलील यांनी स्पष्ट केली.

खा. इम्तियाज जलील यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा
दरम्यान, गुरुवारी औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक मोहम्मद अय्युब जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेटपर्यंत कँडल मार्च करीता पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र या कँडल मार्चची परवानगी सिटीचौक पोलिसांनी नाकारली होती. तसेच असा मार्च काढू नयेत अशी नोटीस देखील पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र तरीही जलील यांच्यासह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन कँडल मार्च काढला. त्यामुळे या प्रकरणी जलील यांच्यासह  शेकडो आंदोलकांवर जमावबंदी आदेशाचं उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रोज शेकडो आक्षेप दाखल 
२७ मार्चपर्यंत नामांतर विरोधी आक्षेप, हरकती  नोंदविण्याची मुदत आहे. रोज शेकडो आक्षेप विभागीय आयुक्तालयात दाखल करण्यात येत आहेत. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय