शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनो, होऊ द्या खर्च !

By admin | Updated: October 7, 2014 00:15 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची मतदार संघात प्रचार रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवाराच्या खर्चावर निवडणूक विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची मतदार संघात प्रचार रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवाराच्या खर्चावर निवडणूक विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. उस्मानाबाद विधानसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील खर्च सादर केला आहे. आजवर १७ जणांनी ६ लाख १२ हजार रूपयांवर खर्च केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर हे खर्चामध्ये आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि काँग्रेस हे चारही पक्ष स्वबळावर लढत आहेत. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून १५ जणांनी माघार घेतल्यानंतर आखाड्यामध्ये २० उमेदवार उरले असून, यामध्ये आठ अपक्षांचा समावेश आहे. सध्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभाही घेतल्या जात असून कॉर्नर बैठका, पदयात्राही काढल्या जात आहेत. यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. या खर्चावर निवडणूक विभागाची पथके नजर ठेवून आहेत. निवडणूक आयोगाने दररोजच्या खर्चासाठी त्यांच्या स्तरावर नोंदवही ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवारांच्या निरीक्षणांसाठी एका अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी केलेल्या खर्चाची नोंद घेतली जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी १ लाख ४९ हजार ६३९ रूपये खर्च केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उमेदवार ओम राजेनिंबाळकर हे आहेत. त्यांनी आतापर्यंत १ लाख ४२ हजार ३५२ रुपये खर्च केल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपाचे संजय पाटील दुधगावकर यांनीही ८३ हजार ३४४ रुपयांचा खर्च केला आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार विश्वास शिंदे हे असून, त्यांनीही ४३ हजार ४१७ रुपयांचा खर्च केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी)अनिल उत्तमराव हजारे यांनी ७ हजार ३५० रुपये, धनंजय मुरलीधर तरकसे पाटील यांनी १४ हजार १३० रूपये, मधुकर गायकवाड ५ हजार ५३१ रुपये, डॉ.रमेश बनसोडे ६ हजार ८० रुपये, संजयकुमार यादव ४१ हजार ४०० रुपये, अकबरखान गुलाबखान पठाण ३५ हजार ६० रुपये, अनिल उत्तमराव हजारे ७ हजार ५३० रुपये तर मधुकर गायकवाड यांचा ५ हजार ५३१ रूपये खर्च झाला असल्याची नोंद निवडणूक विभागाच्या दप्तरी आहे.अपक्षही खर्चात नाहीत मागे४उस्मानाबाद मतदार संघातील अपक्ष उमेदवार अनंत चोंदे यांनी ३० हजार ८२० रुपये, राजाभाऊ उर्फ राजेंद्र ओव्हाळ ५ हजार ९४६ रुपये, किरण टेकाळे १० हजार ६०० रुपये, बालाजी तुपसुंदरे ५ हजार ३०० रुपये, पांडूरंग भोसले १० हजार ६०० रुपये, प्रदिप जाधव १० हजार २०० तर हाजीभाई हन्नुरे यांनी ११ हजार रुपये इतका खर्च केला आहे.दोघांना नोटिसाउमरगा विधानसभा मतदार संघातील दोन उमेदवारांनी निवडणूक खर्चासंदर्भात माहिती सादर न केल्याप्रकरणी बहुजन समाज पार्टीचे दत्ता गायकवाड व रिपब्लिकन पार्टीचे विद्या आबाराव वाघमारे या दोन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. चोवीस तासांमध्ये स्वत: अथवा प्रतिनिधीमार्फत लेख्यांसह उपस्थित रहावे, असे नोटिसीत नमूद केले आहे.तिघांचा खर्च सादर नाही४उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातून अद्याप तिघांनी खर्च सादर केलेला नाही. यामध्ये अ‍ॅड. जयराम घुले, उमेश भालेराव व प्रा. पोपट रणदिवे या तीन उमेदवारांचा समावेश आहे. सदरील तीनही उमेदवार खर्चाच्या तपासणीवेळी गैरहजर राहिल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.