शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वालूरमधील केरोसीन परवाना रद्द

By admin | Updated: April 22, 2016 00:24 IST

परभणी : वालूर येथील केरोसीन परवानाधारकांची चौकशी केल्यानंतर अनेक दोष आढळल्याने सदर परवानाधारकांचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी काढले आहेत़

परभणी : सेलू तालुक्यातील वालूर येथील केरोसीन परवानाधारकांची चौकशी केल्यानंतर अनेक दोष आढळल्याने सदर परवानाधारकांचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी काढले आहेत़ वालूर येथील अर्धघाऊक केरोसीन परवानाधारक सुरेंद्र भगीरथ तोष्णीवाल यांच्याविषयी जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ त्यावरून पाथरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून ७ एप्रिल रोजी अहवाल पाठविला होता़ या चौकशीत अनेक दोष आढळून आले़ त्यात शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे केरोसीनचे वितरण न करणे, कमी केरोसीन वितरित करणे, द्वारपोच योजनेंतर्गत ५० टक्के केरोसीन वितरित न करणे, किरकोळ परवाना धारकांना आरेरावीची भाषा वापरणे, अनावश्यक ३१ हजार ५०० लीटर केरोसीन परवानाधारकास वितरित न करता स्वत:जवळ ठेवणे, अभिलेखे अपूर्ण ठेवणे असे दोष आढळले आहेत़ हे दोष गंभीर स्वरुपाचे असल्याचा निष्कर्ष काढत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी २१ एप्रिल रोजी सुरेंद्र तोष्णीवाल यांचा अर्धघाऊक केरोसीन परवाना रद्द करण्याचा आदेश दिला आहे़ तसेच परवान्यापोटी जमा असलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली आहे़ (प्रतिनिधी)