शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी केजमध्ये चुरस

By admin | Updated: April 12, 2015 00:42 IST

केज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून पद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे. स्पष्ट बहुमताअभावी नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

केज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून पद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे. स्पष्ट बहुमताअभावी नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तूर्त नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुकांत चुरस वाढली आहे.१८ जानेवारी २०१५ रोजी नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. १७ सदस्यांच्या या नगरपंचायतीत कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही; परंतु आठ जागा पटकावून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाने पाच जागा पटकावल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले. दोन अपक्षांनीही पंचायतीत धडक मारली. निकाल जाहीर झाल्यानंतरही चार महिन्यांपासून आरक्षण जाहीर नव्हते. नगरसेवक होऊनही धोरणात्मक निर्णय घेणे कठीण बनल्याने केजकरांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे होते. नगराध्यक्षपद इतर मागासप्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातील महिला व पुरुषांना नगराध्यक्ष होता येणार आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरु केले आहे. काँग्रेसकडे सत्ता आली तर खा. रजनी पाटील व माजी मंत्री अशोकराव पाटील ठरवतील त्याला मान मिळेल. यांच्यापैकी कोण ?१७ पैकी पाच नगरसेवक ओबीसी मागास प्रवर्गात मोडतात. काँग्रेसकडून कबीरोद्दीन नसिमोद्दीन इनामदार, अश्विनी गाढवे, दीपाली डोंगरे तर भाजपाकडून हारुण इनामदार, रेशमा जलीलोद्दीन इनामदार यांचा समावेश आहे. (वार्ताहर)