शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘बुट्टेनाथ’चे काम रखडले शहरासमोर पाणीसंकट

By admin | Updated: April 15, 2016 00:37 IST

अंबाजोगाई : शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या टंचाईला तोंड देण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलाव निर्मिती हा सक्षम पर्याय ठरेल.

अंबाजोगाई : शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या टंचाईला तोंड देण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलाव निर्मिती हा सक्षम पर्याय ठरेल. मात्र पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नसल्यासह इतर तांत्रिक कारणांमुळे तब्बल दहा वर्षांपासून सदरील तलावाचे काम रखडले आहे. आता काम सुरु केल्यास ते लवकर पूर्णत्वास लागेल, असा कयास अंबाजोगाईकरांचा आहे.शहराला गेल्या पंधरा वर्षांपासून पाणीटंचाई तीव्रतेने भेडसावत आहे. मांजरा धरणाचा पर्याय सोडला तर वर्षभर अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा होईल असा एकही पर्यायी तलाव तालुका व परिसरात उपलब्ध नाही. जे आहेत त्यांची पाण्याची साठवण क्षमता अत्यल्प असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न भविष्यातही तीव्रतेने भेडसावणारा आहे. या टंचाई निवारणासाठी बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मिती सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी या तलावाचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला. जलसंपदा विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला एप्रिल २०१३ मध्ये तत्वत: मान्यता मिळाली असून या साठवण तलावाच्या कामासाठी सर्व्हे, स्थळ पाहणी व प्रकल्प प्रस्ताव पाठविण्यासाठी २५ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली होती. मात्र, हा निधी प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारात अडकून राहिला. अंबाजोगाई शहराला १.५० लाख लोकसंख्या गृहित धरून व सिंचन क्षेत्र ३६.२५ हेक्टर गृहित धरून १४.५० दलघमी पाणी क्षमता असलेला हा तलाव निर्माण झाला तर अंबाजोगाई शहराचा पाणीप्रश्न सहज सुटेल मात्र, या तलावाच्या कामाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी उपलब्ध करण्यासाठी नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या वतीने पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणे ही प्रक्रिया तांत्रिक बाबीत अडकल्याने या तलावाचे भवितव्य धोक्यात आहे. या तलावापासून नागापूर धरण जवळ असल्याने व हा परिसर नागापूर धरणाच्या कार्यक्षेत्रात असल्याने या तलावाची निर्मिती स्वप्न ठरते की काय? अशीच अवस्था प्रशासकीय कारभारातून समोर आली आहे. अंबाजोगाई शहरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मिती म्हणून पाहिले जाते. (वार्ताहर)पाणी संकट वर्षागणिक बिकट बनत चालले आहे. त्यामुळे पर्यायी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.आजच्या किंमतीनुसार प्रोजेक्ट मंजूर झाल्यास तो कमी किंमतीत पूर्ण होऊ शकते, परंतु दोन-तीन वर्षांत बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्यानंतर काम पुन्हा निधी अभावी रखडू शकते.