शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तळीराम चालकामुळे प्रवाशांनी थांबविली बस

By admin | Updated: September 11, 2014 01:06 IST

उस्मानाबाद : तळीराम चालकाने कट मारल्याने दुचाकीस्वार युवकांनी पाठलाग करून केलेली पाहणी आणि चालकाचे वर्तन यामुळे प्रवाशांनी सारोळा (ता़उस्मानाबाद) नजीक बस थांबविली़

उस्मानाबाद : तळीराम चालकाने कट मारल्याने दुचाकीस्वार युवकांनी पाठलाग करून केलेली पाहणी आणि चालकाचे वर्तन यामुळे प्रवाशांनी सारोळा (ता़उस्मानाबाद) नजीक बस थांबविली़ उस्मानाबाद आगरातून दुसरा चालक आल्यानंतर ही बस मार्गस्थ झाली़ हा प्रकार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडला़मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद आगारातून औसाकडे जाणारी बस मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातून मार्गस्थ झाली़ सांजा गावाकडे वाहकाने बेल मारल्यानंतर चालकाने जोरात ब्रेक मारले़ यामुळे आतील प्रवाशांना हेलकावा खावा लागला़ तसेच समोरून येणाऱ्या वाहनांना चालक कट मारत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले़ यादरम्यान, सुतमिलजवळही बसचालकाने एका दुचाकीस जोराची कट मारली़ त्यानंतर दुचाकीस्वारांनी सारोळा गावापर्यंत बसचा पाठलाग करून ती थांबविली़ त्यावेळी आतील प्रवाशांनीही चालक मद्यधुंद असल्याची ओरड करीत बस थांबविण्यात आली़ घडला प्रकार राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांचे स्वीय सहाय्यक सावंत यांना देण्यात आली़ त्यांनी तातडीने उस्मानाबाद आगारात माहिती देवून दुसरा चालक पाठविण्याच्या सूचना दिल्या़ सायंकाळी कोंडकडे जाणाऱ्या बसमध्ये दुसरा चालक घटनास्थळी दाखल झाला़ दुसरा चालक आल्यानंतरच प्रवाशांनी औसा बस पुढे जावू दिली़ (प्रतिनिधी)उस्मानाबाद-औसा बसचा चालक मद्यधूंद असल्याचा आरोप प्रवाशांनी केल्यामुळे दुसरा चालक पाठविण्यात आला आहे़ संबंधित चालकाला सोबत घेवून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दुसरे पथक पाठविण्यात आले आहे़ वैद्यकीय तपासणीत तथ्यता आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख जगताप यांनी सांगितले़