शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
3
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
4
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
5
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
6
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
7
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
8
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
9
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
10
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
11
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
12
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
13
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
14
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
15
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
16
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
17
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
18
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
19
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
20
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाचे स्वरुप बदलणार

By admin | Updated: May 27, 2014 00:58 IST

उस्मानाबाद: राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद बसस्थानकाला लवकरच नवा लूक मिळणार आहे़ जवळपास १४ कोटी रूपयांची टेंडरप्रक्रिया महामंडळ स्तरावर पूर्ण झाली.

उस्मानाबाद: राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद बसस्थानकाला लवकरच नवा लूक मिळणार आहे़ जवळपास १४ कोटी रूपयांची टेंडरप्रक्रिया महामंडळ स्तरावर पूर्ण झाली असून, शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ नवीन बसस्थानकात १६ प्लॅटफॉर्मसह इतर आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना पुरविण्यात येणार आहेत़ ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन काम करणार्‍या राज्य परिवहन महामंडळाकडून उस्मानाबाद बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे़ बसस्थानक बांधकामासाठी डीबीएफटीएल तत्त्वावर १३ कोटी, ७२ लाख, ७० हजार रूपयांची टेंडर प्रक्रिया महामंडळ स्तरावर पूर्ण झाली आहे़ महामंडळाच्या एकूण ६६५० चौरस मीटरवर बांधकाम करण्यात येणार आहे़ यात २६५० चौरस मीटरवर दोन मजली बसस्थानकाची इमारत उभी राहणार आहे़ यात १८०० चौरस मीटरवर बसस्थानक, ४५० चौ़मीटरवर अधिकारी निवास, २०० चौरस मीटरवर गेस्टहाऊस, ट्रेनिंग सेंटर, २०० चौरस मीटरवर इतर कामे करण्यात येणार आहे़ गुत्तेदाराला ४००० चौरस मीटर देण्यात येणार आहे़ त्यात विविध दुकाने व इतर आवश्यक त्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे़ बसस्थानकात एकूण १८ प्लॅटफॉर्म उभा राहणार आहेत़ त्यात ग्रामीण भागासाठी सुटणार्‍या बसेससाठी ६ वेगळ्या प्लॅटफॉर्मची उभारणी होणार आहे़ शासनाकडून कार्यादेश मिळाल्यानंतर या कामास प्रारंभ होणार असून, जवळपास ३० महिन्यांत हे बांधकाम पूर्ण होणार आहे़ (प्रतिनिधी) तीन ठिकाणी बांधकाम सुरू राज्य परिवहन महामंडळाकडून वाशी, लोहारा व नळदुर्ग येथे बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे़ वाशी येथे ५० लाखांचा खर्च करून सहा प्लॅटफॉर्म, लोहारा येथे ५० लाखांचा खर्च करून पाच प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे़ प्रसाधनगृह, कंन्ट्रोलरूमची उभारणीही करण्यात येणार आहे़ तर नळदुर्ग बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी ४० लाख रूपयांचा खर्च करण्यात येत आहे़ दर्जेदार ‘सीसीटीव्ही’ची गरज तुळजापूरचे नवीन बसस्थानक वगळता इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत़ उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, भूम आदी विविध बसस्थानकावरील महिलांसह प्रवाशांना लुटल्याच्या घटना आणि महिला-युवतींची छेड काढण्याचा प्रकार पाहता सर्वत्र दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे़ महामंडळाने चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यासह महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे़