रांजणगावात माथेफिरूनी कार जाळली

By Admin | Updated: December 18, 2015 23:49 IST2015-12-18T23:37:52+5:302015-12-18T23:49:28+5:30

वाळूज महानगर : वाहने जाळणाऱ्या माथेफिरूने शुक्रवारी पहाटे रांजणगाव शेणपुंजी येथील रावसाहेब बोऱ्हाडे यांची कार जाळून पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे.

Burnt car burns at Ranjanga | रांजणगावात माथेफिरूनी कार जाळली

रांजणगावात माथेफिरूनी कार जाळली

वाळूज महानगर : वाहने जाळणाऱ्या माथेफिरूने शुक्रवारी पहाटे रांजणगाव शेणपुंजी येथील रावसाहेब बोऱ्हाडे यांची कार जाळून पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे. वाहने जाळणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाळूज महानगरात काही महिन्यांपूर्वी वाहने जाळणाऱ्या माथेफिरू टोळीने हैदोस घातला होता. बजाजनगर, सिडको, रांजणगावातील अनेक वाहनांची या टोळीने होळी केली.
या प्रकरणातील एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्यानंतर मध्यंतरी वाहने जाळण्याचे प्रमाण आटोक्यात आले होते. या माथेफिरू टोळीने शुक्रवारी पहाटे ४ वाजेदरम्यान रावसाहेब बोऱ्हाडे (रा. नेहरूनगर, रांजणगाव शेणपुंजी) यांची घरासमोर उभी केलेली कार व त्यांच्या घरासमोरील प्रल्हाद लोहार यांचे पत्र्याचे शेड जाळले. यात कारचा समोरील व आतील भाग जळून खाक झाला तर पत्र्याचे शेडही जळाले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुुरू होती.
वाळूज एमआयडीसी पोलिसांनी वाहने जाळणाऱ्या एका माथेफिरूला काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. अटक केलेल्या माथेफिरूने एक वर्षापासून वाहने जाळत असून, कोणत्या भागात किती वाहने जाळली, याची कबुली दिली आहे. परंतु बजाजनगर व इतर भागांत वाहने जाळण्याचे सत्र मागील ५ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे अन्य वाहने कोणी जाळली, मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध लावणे वाळूज एमआयडीसी पोलिसांसमोर एक आव्हानच
आहे.

Web Title: Burnt car burns at Ranjanga