शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सहाही मतदारसंघांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: August 4, 2014 00:53 IST

सहाही मतदारसंघांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

लातूर : भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या रविवारी मुलाखती घेतल्या. लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या.प्रचंड घोषणाबाजी अन् शक्तीप्रदर्शनाने शासकीय विश्रामगृहाचा परिसर रविवारी गजबजून गेला होता. समर्थक कार्यकर्त्यांचे जथ्येच्या जथ्ये शासकीय विश्रामगृहावर ठाण मांडून होते. पक्ष निरीक्षक आमदार सुधाकर देशमुख व आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी सकाळी ११.३० वाजता मुलाखतीला प्रारंभ केला. सुरुवातीला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर अहमदपूर व निलंगा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. उदगीर व लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी रात्री उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या. औसा विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घ्याव्यात, असा आग्रह किरण उटगे यांनी धरला होता. त्यांनी शक्तीप्रदर्शनही केले. (प्रतिनिधी)लातूर शहर विधानसभा...लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी रात्री उशिरापर्यंत मुलाखती चालल्या. शैलेश लाहोटी, सुधीर धुत्तेकर, बाबू खंदाडे, अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, अ‍ॅड. बळवंत जाधव, अ‍ॅड. प्रदीप मोरे, देविदास काळे, डॉ. मन्मथ भातांब्रे यांनी मुलाखती दिल्या.मतदारसंघ महिलांना सोडावेत...सहा विधानसभा मतदारसंघापैकी किमान दोन मतदारसंघ महिलांसाठी सोडावेत, अशी मागणी निरीक्षकांकडे लता मुंडे यांनी केली.उदगीरमध्ये सर्वाधिक इच्छुक... उदगीर राखीव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची सर्वाधिक गर्दी होती. विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह मोहन माने, विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचे पुतणे विश्वजित गायकवाड, माजी आमदार टी.पी. कांबळे, शिवाजी सूर्यवंशी, माजी आ. रामचंद्र नावंदीकर, पांडुरंग सूर्यवंशी, शिवाजी लकवाले, रामचंद्र अदावळे, बालाजी गवारे, सरस्वती मिरगे, अंबादास अमलपुरे, दयानंद कांबळे, पांडुरंग भालेराव, नामदेव कदम, बालाजी कांबळे, मीराताई कांबळे, डॉ. अनिल कांबळे, पंडित सूर्यवंशी, बालाजी सिंदगीकर, लक्ष्मण अदावळे आदींनी मुलाखती दिल्या.अहमदपुरातील इच्छुक... लातूर ग्रामीण...अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप देशमुख, बालाजी पाटील चाकूरकर, गणेश हाके, अशोक केंद्रे, भारत चामे, बब्रुवान खंदाडे, रामचंद्र तिरुके, शिवाजी भिकाणे, शालिनी कराड, वसंत डिगोळे, शाम मुंजाने, राजकुमार मजगे आदींनी शक्तीप्रदर्शन करून मुलाखती दिल्या. मुलाखतीचा प्रारंभ सकाळी ११.३० वाजता लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून झाला. सर्वप्रथम रमेश कराड यांनी मुलाखत दिली. बाबूराव खंदाडे, बालकिसन अडसूळ, जि.प.चे माजी सदस्य राजकुमार कलमे, डॉ. मन्मथ भातांब्रे यांनी मुलाखती दिल्या. उमेदवारीसाठी प्रचंड शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी यावेळी पहायला मिळाली.निलंगा विधानसभेतील इच्छुक... निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी संभाजी पाटील यांच्यासह शिवाजी बिराजदार, मिनाक्षी पाटील, डॉ. भातांब्रे यांनी मुलाखती दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी रुपाताई पाटील यांच्यासाठी पक्ष निरीक्षकांकडे आग्रह धरला. औैसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने तो सोडून घ्यावा, अशी मागणी किरण उटगे यांनी केली. त्यांनी शक्तीप्रदर्शनासह यावेळी मुलाखत दिली.संभाजी पाटील निलंगेकरांपुढे तगडे आव्हान... भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेतृत्व करू पाहणाऱ्या संभाजी पाटील निलंगेकरांपुढे इच्छुकांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. जिल्हा परिषदेतील माजी उपाध्यक्ष व दीर्घकाळ जिल्हा परिषदेत राहिलेले अ‍ॅड. संभाजी पाटील यांचा एकेकाळी जि.प.त पराभव केलेले शिवाजी बिराजदारांनी भाजपाकडून मुलाखत दिली आहे. त्यांचे मोठे आव्हान संभाजी पाटील निलंगेकरांपुढे आहे. जनता दलाच्या तिकिटावर काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पराभव करून शिवाजी बिराजदार जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. आता भाजपातील तिकिटाच्या स्पर्धेतही बाजी मारतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांतून होती.