शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत प्रक्रियेला आचारसंहितेचा ब्रेक !

By admin | Updated: June 19, 2014 00:21 IST

लोहारा : तालुक्याचे ठिकाण असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीला नगर पंचायतचा दर्जा देण्याबाबत सुरू असलेली प्रक्रिया अचारसंहितेत अडकली आहे़

लोहारा : तालुक्याचे ठिकाण असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीला नगर पंचायतचा दर्जा देण्याबाबत सुरू असलेली प्रक्रिया अचारसंहितेत अडकली असून, प्रशासकीय कामकाजाची गतीही मंद आहे़ मार्चमध्ये शासन निर्णय जाहीर झाला असला तरी जून अखेरपर्यंत आक्षेप मागविण्यात आले असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे़ नगरपंचायतची प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी राजकीय नेतेमंडळींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे़लोहारा शहराला युती शासनाच्या काळात तालुक्याचा दर्जा मिळाला आणि खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळाली़ ग्रामपंचायत अस्तित्वात असल्याने शासकीय कार्यालये आली. इमारती उभारल्या पण पायाभूत सुविधा या शहरातील नागरिकांना म्हणाव्या तशा मिळाल्या नाहीत़ त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतकडून झाल्याचे दिसत नाही़ त्यामुळे अंतर्गत रस्ते, गटारी अशा अनेक पायाभूत सुविधेचा अभाव आजही शहरात आहे. त्यात राज्य शासनाने राज्यातील ज्या तालुक्याच्या ठिकाणी आजही ग्रामपंचायत कार्यरत आहेत. त्याठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्याचा निर्णय १ मार्च २०१४ रोजी घेतला. पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उद्घोषणा शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत तशी अधिसूचना निर्गमित करण्याकरिता आक्षेप मागविण्याच्या दृष्टीने त्यास व्यापक प्रसिद्धी देण्यात आली नाही. म्हणून राज्य शासनाने ३१ मे २०१४ रोजी उद्घोषणा काढली. याला आता ३० जून पर्यंत आक्षेप मागविण्यात येणार असून, लोहारा नगर पंचायत स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विकासात चांगलीच भर पडणार असून, शहराचा यामुळे चेहरामोहराच बदलणार आहे. लोहारा शहराचे क्षेत्र हे १७७८ चौरस हेक्टर असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा क्र. ३) अन्वये स्थापन केलेल्या लोहारा ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची हद्द कायम करण्यात आली आहे. यामध्ये गावठाण व सर्व्हे नं. १ ते १२८ येणार आहे. पण नगर पंचायतच्या दृष्टीने आरक्षित क्षेत्र अद्यापही ठेवण्यात आलेले नाही. (वार्ताहर)असा होणार लाभलोहारा नगरपंचायत होणार असल्याने आता ग्रामविकास खात्याकडून नगरविकास विभागाकडे वर्ग होणार आहे. याठिकाणी वर्ग दोनचा अधिकारी येणार आहे. राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट नगरपंचायतला मिळणार आहे़ तर विशेष निधी प्रयत्नातून मिळू शकतो. यामुळे अंतर्गत सिमेंटचे रस्ते, गटारी, स्टेट लाईट आदी पायाभूत सुविधा या शहरातील नागरिकांना मिळतील. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही नियोजनाद्वारे मार्गी लागू शकतो़विकासाचे होणार राजकारणग्रामपंचायत निवडणुकीत अनेकजण एकत्रित मोट बांधून निवडणूक लढवित सरपंच, उपसरपंच होतात़ नंतर आपण अमूक पक्षाचे म्हणून जाहीर केले जाते़ मात्र, नगरपंचायत निवडणूक लढविताना राजकीय पक्षाचा किंवा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार. त्यामुळे लोहारा नगर पंचायत आपल्याच पक्षाच्या ताब्यात कशी येईल, यासाठी शहरातील सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना कंबर कसावी लागणार आहे. यातून शहराच्या विकासाचेही राजकारण होईल, अशी आशा आहे़कर आकारणीचा फटकानगर पंचायतमुळे शहरात पायाभूत सुविधा मिळतील, शहराचा विकास होईल पण कर आकारणीची पद्धत ही ग्रा.पं. पेक्षा वेगळी राहणार आहे़ घरपट्टी, नळपट्टी ही नागरिकांना वेळेवर भरावी लागेल अन्यथा नगरपंचायत कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही. त्यात व्यापाऱ्यांना सध्या ग्रामपंचायतला एक रुपयांचाही कर द्यावा लागत नाही. पण नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर मात्र त्यांना कर द्यावा लागेल. यामुळे शहरातील नागरिकांना, व्यापाऱ्यांना सोयी-सुविधांसाठी का होईना; कराचा फटका सोसावा लागणार आहे़