शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याविना चालतो वीज मंडळाचा कारभार

By admin | Updated: June 21, 2014 00:49 IST

पाथरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पाथरी येथील उपविभागीय कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याची पदे गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहेत.

पाथरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पाथरी येथील उपविभागीय कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याची पदे गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहेत. या उपविभागांतर्गत सहा ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र कार्यान्वित असून कनिष्ठ अभियंत्याच्या रिक्त पदांमुळे या उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यावरच कामाचा बोजा मात्र वाढला आहे. तर लाईमनकडे कनिष्ठ अभियंत्याचा पदभारही देण्याची वेळ या उपविभागावर आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशी अवस्था असल्याने आगामी काळात विजेची गंभीर समस्या निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे पाथरी येथे उपविभागीय कार्यालय आहे. या उपविभागांतर्गत सहा ३३ के.व्ही. उपकेंद्र येतात. यामध्ये बाभळगाव, पाथरी, वाघाळा, गुंज, हादगाव आणि कासापुरी या उपकेंद्रांचा समावेश आहे. तालुक्यामध्ये घरगुती आणि वाणिज्य ग्राहकांची संख्या १० हजार ५०० तर कृषीपंप ग्राहकांची संख्या ९ हजार ५०० आहे. म्हणजेच या तालुक्यात २० हजार ग्राहकांची संख्या आहे. उपविभागाला स्वतंत्र सहाय्यक अभियंता मिळाला खरा परंतु कार्यालयात कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने वीज समस्येची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या उपविभागात पूर्वी चार कनिष्ठ अभियंत्यांची पदे मंजूर होती. त्यानंतर संबंधित विभागाने दोन कनिष्ठ अभियंत्याच्या पदाला कात्री लावून या उपविभागात ग्रामीण १ व ग्रामीण २ अशी पदे कार्यान्वित केली. कनिष्ठ अभियंता ग्रामीण १ कडे पाथरी शहर, ३३ के.व्ही. बाभळगाव, ३३ के.व्ही. वाघाळा, ३३ के.व्ही. गुंज, ३३ के.व्ही. पाथरी देण्यात आली तर ग्रामीण कनिष्ठ अभियंता २ कडे ३३ के.व्ही. हादगाव, ३३ के.व्ही. कासापुरी हे दोन भाग देण्यात आले. चार महिन्यांपूर्वी या भागात कार्यरत असणाऱ्या दोन्ही कनिष्ठ अभियंत्याची बदली विभागाच्या बाहेर झाली. त्यानंतर कनिष्ठ अभियंत्याची पदे मात्र भरण्यात आली नाही. पर्यायाने या उपविभागाचे सहाय्यक अभियंता दीपक तुरे यांच्याकडे कामाचा बोजा वाढला. दिवसभर कार्यालयात वीज समस्येसाठी शेकडो ग्राहक तक्रारी घेऊन येतात. कनिष्ठ अभियंता नसल्याने ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा वेळेच्या आत होणेही अवघड होऊन बसले आहे. या उपविभागातील सहा ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत विजेचा भारही मोठा वाढल्याने अनेकवेळा विजेमध्ये बिघाड होतो. पर्यायाने नागरिकांची ओरड होऊ लागली आहे. रिक्त पदे का भरण्यात आली नाहीत याचे गौडबंगाल मात्र ना ग्राहकांना ना संबंधित विभागाच्या अधिकारी कळाले नाही. या उपविभागातील विजेच्या समस्येमध्ये आगामी काळात वाढ होणार आहे.पावसाळा तोंडावर आहे, पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक वेळा विजेमध्ये बिघाड होतो, पर्यायाने रात्री-बेरात्री नागरिक वीज मंडळाकडे संपर्क साधतात परंतु कर्मचारीच नसल्याने वीज समस्या सुटण्याऐवजी वाढू लागली आहे. (वार्ताहर)दोन उपकेंद्राची आवश्यकतातालुक्यात सहा ३३ के.व्ही. उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रांतर्गत विजेचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. भारनियमनाव्यतिरिक्तही ट्रान्सफार्मर विजेच्या दाबामुळे अनेकवेळा बंद पडतात. यामुळे ढालेगाव आणि लिंबा येथे दोन नवीन ३३ के.व्ही. उपकेंद्र कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.