शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची सदस्य नोंदणी एक कोटी

By admin | Updated: April 20, 2015 00:30 IST

जालना : भारतीय जनता पार्टीची गेल्या चार महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या सदस्य नोंदणीने एक कोटीचा आकडा पूर्ण केला

जालना : भारतीय जनता पार्टीची गेल्या चार महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या सदस्य नोंदणीने एक कोटीचा आकडा पूर्ण केला. जिल्ह्याचे सुपुत्र व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रविवारी आनंदोत्सव साजरा केला. संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी ही नोंदणी मोठ्या प्रमाणावर करून उद्दिष्ट पूर्ण केले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. ही सदस्य नोंदणी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असून देशात एकूण सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट १० कोटी होते. त्यापैकी महाराष्ट्र राज्याने एक कोटी सदस्य नोंदवून १० टक्के वाटा उचलला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दुरध्वनीवरून संवाद साधून खा. दानवे यांचे अभिनंदन केले आहे. जालना जिल्ह्यास २ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते जिल्ह्याने पूर्ण केल्याबद्दलही प्रदेशाध्यक्ष दानवे व पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे. या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, आज सकाळी पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून, पेढे वाटप करून जल्लोष केला. यावेळी माजी आमदार अरविंद चव्हाण, भास्कर दानवे, उपसभापती रामेश्वर भांदरगे, सुभाष पालवे, सुधाकर खरात, सिद्धिविनायक मुळे, रवींद्र देशपांडे, सुधाकर शिंदे, सुरेश कदम, मनोज बीडकर, अनिरुद्ध शेळके, अमरदिप शिंदे, दाभाडे, नामदेव नागवे, संजय डोंगरे, कोल्हे, जोशी (प्रतिनिधी)