शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:44 IST

आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनी केला होता. ते खरेही आहे. जनहिताची कामे आम्ही आमदार म्हणून मांडतो तेव्हा ती केली तर जात नाहीत उलट संशयाने पहिले जाते. आम्ही युतीत असलो भाजप सरकार सत्यापासून दूर गेल्याचा आरोप माजीमंत्री आ.जयप्रकाश मुंदडा यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनी केला होता. ते खरेही आहे. जनहिताची कामे आम्ही आमदार म्हणून मांडतो तेव्हा ती केली तर जात नाहीत उलट संशयाने पहिले जाते. आम्ही युतीत असलो भाजप सरकार सत्यापासून दूर गेल्याचा आरोप माजीमंत्री आ.जयप्रकाश मुंदडा यांनी केला.शिवसेनेच्या वतीने कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख संतोष बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उद्धवराव गायकवाड, भैय्या पाटील गोरेगावकर, डी.के. दुर्गे, जि.प.सदस्य अंकुश आहेर, फकिरा मुंढे, सभापती रामेश्वर शिंदे, नगरसेवक सुभाष बांगर, राम कदम, सवंडकर, भवर आदींची उपस्थिती होती.मुंदडा म्हणाले, शेतकºयांच्या प्रश्नांना भाजप सरकार महत्वच देत नाही. कर्जमाफीची घोषणा निव्वळ फसवी आहे. वारंवार आदेश बदलत आहेत. म्हाताºयांनाही आॅनलाईन केंद्रावर रांगेत उभे राहावे लागत आहे तरीही कर्जमाफी मिळेल, याची शाश्वती नाही. केंद्र सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या फसव्या आहेत. जनधनचे खाते उघलेल्यांना १५ लाख कधी खात्यात पडणार, याची प्रतीक्षा आहे. गॅसची सबसिडी हळूहळू काढून घेतली जात आहे. तर किंमतही वाढवत आहेत. पूर्वीच्या शासनाच्या योजनांची नावे बदलून चमकोगिरी केली. प्रत्यक्षात लाभ मात्र दिला जात नाही.मुंदडा म्हणाले, नोटाबंदीनंतर दहशतवाद संपेल, काळा पैसा बाहेर येईल असे मोदींनी सांगितले होते. हे दोन्ही झाले नाही मात्र २००० च्या नोटा छपाई सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात सापडत होत्या. त्यामुळे भाजपवाल्यांनी काळा पैसा निर्माण केल्याचे ते म्हणाले. २ कोटी जणांना रोजगार देण्याचे मोदींनी जाहीर केले होते. तो तर मिळाला नाही. मात्र जीएसटीनंतर ५० लाख जणांनी नोकºया गमावल्या. जीएसटी कर सामान्य जनतेकडूनच वसूल होत आहे. तो शासनाकडे व्यापाºयांना फक्त भरायच्या आहे. व्यापारी तेवढ्यातच परेशान आहे. पण खिसा तर आपलाच कापला जातोय, हे लोकांना कळत नाही. मलाई लाटण्यासाठी विविध कंत्राटेही राज्य, राष्ट्रीय स्तरावरून देऊन ग्रामीण कंत्राटदारांवर बेकारीची वेळ आणली जात आहे.