शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा इच्छुकांचा सर्वच मतदारसंघावर दावा

By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST

नांदेड : भाजपाकडून शनिवारी इच्छुकांची माहिती गोळा करण्यासाठी आलेल्या पक्षनिरीक्षकांसमोर निष्ठावंतांसह नवख्यांनी शक्तिप्रदर्शन करीत सर्व मतदारसंघावर दावा केला़

नांदेड : भाजपाकडून शनिवारी इच्छुकांची माहिती गोळा करण्यासाठी आलेल्या पक्षनिरीक्षकांसमोर निष्ठावंतांसह नवख्यांनी शक्तिप्रदर्शन करीत सर्व मतदारसंघावर दावा केला़ आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या व आयात केलेल्या उमेदवारांवर आळा घालण्याची मागणी निष्ठावंतांनी केली़दोनच दिवसांपूर्वी नांदेडात येवून गेलेल्या प्रदेश सरचिटणीसांनी कार्यकर्त्यांनी सर्वच्या सर्व नऊ जागांसाठी तयार राहण्याचे सुतोवाच केले होते़ त्याचवेळी निष्ठावंतांनी दुसऱ्या पक्षातून आलेल्या संधिसाधूंच्या बाबतीत आक्षेप घेतले होते़ त्यानंतर शनिवारी अमरावतीचे खा़ रामदास तडस व माजी महापौर निवेदिता चौधरी हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी नांदेडात आले होते़ त्यांच्यासमोरही इच्छुकांनी दिल्लीत सत्ता आल्याचे पाहून हाती कमळ धरलेल्यांना संधी देणार की, निष्ठावंतांना असा प्रश्न उपस्थित केला़ सत्ता नसताना एवढे वर्षे पक्षाचे काम केलेल्या निष्ठावंतांना लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्येही डावलण्यात येवू नये अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली़ यावेळी सर्व नऊ मतदारसंघावर दावा करीत इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले़ यावेळी किनवटमधून सुधाकर भोयर, धरमसिंह राठोड, किसन मिराशे, बिभिषण राठोड, अ‍ॅड़जायभाये, हदगाव-पंडितराव देशमुख, गजानन तुप्तेवार, भोकर-राम चौधरी, प्रवीण गायकवाड, नायगाव- श्रावण पाटील भिलवंडे, राजेश पवार, गंगाराम ठक्करवाड, लोहा- गीते महाराज, केरु सावकार बिडवई, बाबूराव कांगणे, मुक्तेश्वर धोंडगे, मुखेड- गोविंद राठोड, किशन राठोड, राम पाटील रातोळीकर (यामध्ये इच्छुकांची नावे वाढण्याची शक्यता आहे) यांच्यासह अनेकांनी शक्तिप्रदर्शन केले़ त्याचबरोबर नांदेड उत्तर आणि दक्षिणवरही इच्छुकांनी दावा केला़ सर्व मतदारसंघावर भाजपाच्या इच्छुकांनी केलेल्या दाव्यामुळे सेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता आहे़ यावेळी भाजपाचे अ‍ॅड़ प्रवीण साले, डॉ़ अजित गोपछडे, चैतन्यबापू देशमुख, देवीदास राठोड, व्यंकटेश साठे, गोविंद यादव यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)