शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सलीम अली सरोवरातील जैवविविधता अबाधित

By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेने ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे नुकतेच सुशोभीकरण केले.

औरंगाबाद : महानगरपालिकेने ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे नुकतेच सुशोभीकरण केले. त्यामुळे या तलावातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला नसल्याचे शपथपत्र महानगरपालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नुकतेच औरंगाबाद खंडपीठात सादर केले आहे.सलीम अली सरोवरात विविध प्रकारचे जलचर तसेच तलाव परिसरात असलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडांमुळे तेथे मोठ्या प्रमाणात पक्षी आणि अन्य जीव आहेत. सरोवराच्या सुशोभीकरणासाठी सरोवर परिसरात बांधकामे करण्यात आली. त्यामुळे तेथील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून सलीम अली सरोवरसंवर्धन समितीचे समन्वयक अरविंद पुजारी यांनी अ‍ॅड. महेश भारस्वाडकर यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.याचिकेच्या सुनावणीवर न्यायालयाच्या आदेशाने महानगरपालिकेने जैवविविधता संरक्षण व संवर्धन समिती स्थापन केली. सरोवरातील जैवविविधतेला बाधा येईल, असे कोणतेही काम तेथे केले जाणार नाही, अशी ग्वाही मनपातर्फे देण्यात आली होती. मनपाने सरोवराचे नुकतेचे सुशोभीकरण व प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले.याचिका पुन्हा सुनावणीसाठी आली असता अ‍ॅड. भारस्वाडकर यांनी मनपाच्या कामाला आक्षेप घेतला. न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असताना उद्यानाचे काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मनपाने उद्यानाची वेळ सकाळी १० ते ६ असल्याचे आयुक्तांनी सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले. तेथील जैवविविधतेला धोका नसल्याचे शपथपत्रात स्पष्ट करून त्यांनी सरोवरावर पक्षी निरीक्षक केंद्र, अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे सांगितले. हे करण्यापूर्वी मनपाने जैवविविधता संरक्षण व संवर्धन समितीची परवानगी घेतली होती. खंडपीठाच्या सूचनांचे पालन करण्यात आले. सरोवर परिसरात तीन सुरक्षारक्षक नेमले असून पक्षी सकाळी निघून जातात आणि सायंकाळी ६ नंतर परत येतात तर नागरिक सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तेथे असतात. या प्रकरणात महानगरपालिकेच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.