शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

मनपात आजपासून बायोमेट्रिक हजेरी

By admin | Updated: August 4, 2015 00:38 IST

औरंगाबाद : मनपात लेटलतीफ कर्मचाऱ्यांना वेसण घालण्याकरिता उद्यापासून बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविणे सक्तीचे करण्यात आले आहे.

औरंगाबाद : मनपात लेटलतीफ कर्मचाऱ्यांना वेसण घालण्याकरिता उद्यापासून बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविणे सक्तीचे करण्यात आले आहे. मनपा आयुक्तांनी सोमवारी सर्व विभागप्रमुखांना तशा लेखी सूचना दिल्या असून, रजिस्टरमध्ये कुणीही हजेरी नोंदवू नये याकरिता संबंधित विभागांमधील हजेरी रजिस्टरही हटविण्यास सांगण्यात आले आहे. महापौर त्र्यंबक तुपे आणि मनपा आयुक्त पी. एम. महाजन यांनी आज सकाळी १० वाजता मुख्य इमारतीत पाहणी केली. यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात पोहोचले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आयुक्तांनी मनपाची दोन्ही प्रवेशद्वारे बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व विभागातील हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले, तर १० वाजेच्या ठोक्याला कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांनाही रजिस्टरऐवजी बायोमेट्रिक मशीनवरच हजेरी नोंदविण्याचे आदेश दिले. त्यामुळे मनपात आज पहिल्यांदाच बायोमेट्रिक मशीनसमोर हजेरी नोंदविण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग लागली. यानंतर लगेचच आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून उद्यापासून मनपात बायोमेट्रिक पद्धतीनेच हजेरी नोंदविली जाईल, कुणीही रजिस्टरमध्ये हजेरी नोंदवून घेऊ नये, असे आदेश त्यांनी दिले. सर्व कर्मचाऱ्यांचे हजेरीपट तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महापौर आणि मनपा आयुक्त यांनी सोमवारी संयुक्त पाहणी केली. या पाहणीत मनपाची मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा ३ या दोन इमारतीत सुमारे साडेतीनशे कर्मचारी गैरहजर आढळले. ४मात्र, ही शेवटची संधी समजून सर्वांना सूट देण्याचे आदेश महापौरांनी दिले; परंतु आता उद्यापासून बायोमेट्रिक मशीनवर हजेरी घेण्यात येणार असून त्याच्या नोंदी रोज लेखा विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे गैरहजर आढळणाऱ्यांचे वेतन कपात होणार आहे, असे महापौरांनी सांगितले.