कंपनीत कामावर जाताना उभ्या कंटेनरवर धडकून दुचाकीस्वार कामगार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:50 IST2024-09-10T17:48:58+5:302024-09-10T17:50:01+5:30

नगर महामार्गावरील शिवराई जवळील घटना

Bike rider killed after hitting vertical container | कंपनीत कामावर जाताना उभ्या कंटेनरवर धडकून दुचाकीस्वार कामगार ठार

कंपनीत कामावर जाताना उभ्या कंटेनरवर धडकून दुचाकीस्वार कामगार ठार

वाळूज महानगर : उभ्या कंटेनरला धडकल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता वाळूज जवळील शिवराई रोडवर घडली. धर्मेंद्र दुधनाथ हर्जन (वय ३३, रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश, ह.मु.रहिमपूर, ता. गंगापूर) असे मयताचे नाव आहे. अपघातानंतर कंटेनरचालक घटना स्थळावरून फरार झाला.

धर्मेंद्र हर्जन हा काही दिवसांपूर्वी रोजगाराच्या शोधात वाळूजला आला होता. लिंबेजळगाव जवळील रहिमपूर येथे रूम किरायाने घेऊन तो गवंडी काम करीत होता. रविवारी सकाळी तो दुचाकीने (एमएच २० ईएच ७९०२) रहिमपूरहून वाळूजच्या दिशेने कामासाठी चालला होता. शिवराई गावाजवळील एका गॅरेजसमोर रस्त्यावर उभ्या कंटेनरवर (जेएच ०९ एवाय ७१८६) पाठीमागून धडकून गंभीर जखमी झाला. पोलिसांनी धर्मेंद्रला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: Bike rider killed after hitting vertical container