बीड बायपासवर अर्धवट कामाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:21 IST2023-01-16T12:20:51+5:302023-01-16T12:21:43+5:30

हिवाळे पाटील लॉनसमोर त्याला रस्त्यातील मातीचा ढिगारा दिसला नाही.

Bike reider killed in partial work on Beed Bypass | बीड बायपासवर अर्धवट कामाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

बीड बायपासवर अर्धवट कामाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

औरंगाबाद : बीड बायपासवर रस्त्याच्या अर्धवट कामाने दुचाकीस्वाराचा बळी घेतल्याची घटना हिवाळे पाटील लॉन्ससमोर रविवारी (दि. १५) सायंकाळी घडली. प्रमोद दरंदले (२२, रा. उस्मानपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

बायबास रोडवरून प्रमोद दरंदले हा दुचाकीवरून (एमएच१७ एटी ५९०७) जात होता. हिवाळे पाटील लॉनसमोर त्याला रस्त्यातील मातीचा ढिगारा दिसला नाही. गाडी ढिगाऱ्यावरून गेल्याने पडली व तो दुभाजकावर आदळून गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात नेले. त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Web Title: Bike reider killed in partial work on Beed Bypass