मोठी बातमी! जी. श्रीकांत मराठवाड्याचे नवे विभागीय आयुक्त; १४ दिवसांतच 'होम कमिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 20:14 IST2026-04-16T20:14:05+5:302026-04-16T20:14:35+5:30

जी. श्रीकांत यांची बदली झाल्यापासून पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता.

Big news! G. Srikanth the new Divisional Commissioner of Marathwada; 'Homecoming' within 14 days | मोठी बातमी! जी. श्रीकांत मराठवाड्याचे नवे विभागीय आयुक्त; १४ दिवसांतच 'होम कमिंग'

मोठी बातमी! जी. श्रीकांत मराठवाड्याचे नवे विभागीय आयुक्त; १४ दिवसांतच 'होम कमिंग'

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा विभागीय आयुक्तपदावर अखेर जी. श्रीकांत यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे अधिकृत आदेश धडकले. तर विद्यमान आयुक्त जितेंद्र पापळकर यांची मुंबई येथे जीएसटी सहआयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १४ दिवसांपूर्वी २ एप्रिल रोजी जी. श्रीकांत यांची मनपा आयुक्तपदावरून बदली झाली होती, मात्र दोन आठवड्यांतच ते पुन्हा मोठ्या पदावर शहरात परतले आहेत.

मंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
जी. श्रीकांत यांची बदली झाल्यापासून पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना शहरातच ठेवावे, अशी आग्रही मागणी या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत जी. श्रीकांत यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करून दोन्ही मंत्र्यांच्या शब्दाला मान दिला आहे.

प्रशासकीय फेरबदल
याच आदेशासोबत सिडकोचे मुख्य प्रशासक जगदीश मिणीयार यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांची रवानगी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. दरम्यान, सिडकोच्या मुख्य प्रशासक पदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती जाहीर झालेली नाही. आपल्या बदलीवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र पापळकर यांनी शासनाचा निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट केले.

Web Title : जी. श्रीकांत मराठवाड़ा के नए विभागीय आयुक्त नियुक्त

Web Summary : जी. श्रीकांत को मराठवाड़ा का नया विभागीय आयुक्त नियुक्त किया गया है, तबादले के कुछ हफ़्तों बाद ही। मंत्रियों ने उनके बने रहने की वकालत की, मुख्यमंत्री ने सुनी। जितेंद्र पापळकर का तबादला मुंबई जीएसटी में, सिडको प्रमुख का भी तबादला।

Web Title : G. Srikant Appointed Marathwada Divisional Commissioner After Brief Transfer

Web Summary : G. Srikant is Marathwada's new Divisional Commissioner, just weeks after his transfer. Ministers advocated for him to stay, and the CM listened. Jitendra Papalkar moves to Mumbai GST, while Cidco's head is also transferred.