शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

कॉंग्रेसला मोठा धक्का; मात्तबर नेत्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्षा करणार भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 11:38 AM

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी इनकमिंग

श्रीकांत पोफळेकरमाड (औरंगाबाद) : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मीनाताई शेळके आणि त्यांचे पती तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू काका शेळके समर्थकांसह आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. भाजपचे आ. हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा ते भाजपत प्रवेश करतील. 

उस्मानपुरा येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयात हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पार पडणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. रामुकाका हे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे काम करत होते. काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ता ते कुंबेफळ गावचे सरपंच तर पुढे त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होईपर्यंत रामू काका शेळके हे काँग्रेसची एकनिष्ठ होते. 

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नंतर फुलंब्री मतदार संघात तथा औरंगाबाद तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यात रामू काका शेळके यांचा सिंहाचा वाटा आहे. आगामी काळात रामू काका शेळके हे विधानसभेचे उमेदवार म्हणून देखील त्यांच्याकडे बघितल्या जात होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने रामू काका शेळके सारख्या बड्या नेत्याला भाजपमधून काय मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. रामू काका शेळके यांच्या भाजपा प्रवेशामुळे हरिभाऊ बागडे यांच्यानंतर फुलंब्री विधानसभेचे आस लावून बसलेल्या अनेक नेत्यांचे धाबे दणाणणार आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाAurangabadऔरंगाबादHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे