शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा बीडच भारी!

By admin | Updated: June 18, 2014 01:41 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही बीड जिल्ह्याने आपला दबदबा कायम राखला़

व्यंकटेश वैष्णव , बीडबारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही बीड जिल्ह्याने आपला दबदबा कायम राखला़ गतवर्षी विभागात अव्वलस्थान पटकावणाऱ्या बीडने यावर्षी ९१ टक्के गुणांसह क्रमांक एकचे स्थान कायम राखले़ त्यामुळे मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात बीडचेच विद्यार्थी भारी ठरले आहेत़महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१४ मध्ये परीक्षा पार पडल्या़ बीड जिल्ह्यातील ३५ हजार ५४८ मुलामुलींनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३२ हजार ६६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बीडच्या निकालाचा टक्का ९१़८८ इतका आहे़ ही टक्केवारी विभागात सर्वाधिक आहे. विभागात बीड खालोखाल जालना जिल्ह्याचा निकाल ८८.४५ टक्के, औरंगाबाद ८८.१४ टक्के, हिंगोली ८०.८३ व परभणी ७९़१६ टक्के इतका लागला. विशेष म्हणजे विभागाची एकून टक्केवारी ८७.०६ इतकी असून त्यापेक्षाही बीड चार टक्क्यांनी पुढे आहे़ त्यामुळे जिल्ह्यातीलच विद्यार्थी हुशार असल्याचे सिद्ध झाले़ मुलींनी पटकावले अव्वलस्थानजिल्ह्यातील १९ हजार ३४३ मुले व १३ हजार ३१७ मुली असे एकूण ३२ हजार ६६० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले़ उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ९०़७१ इतकी आहे तर मुलींची टक्केवारी ९३़६२ टक्के इतकी आहे़ जिल्ह्यातील १४ हजार २२४ मुलींनी तर २१ हजार ३२४ मुलांनी ही परीक्षा दिली़जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या. बीडमध्ये मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०़७१ तर मुलींची ९३़६२ इतकी आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.०२ टक्के, परभणीची टक्केवारी ८३.१० , जालन्याची ८८.४५ व हिंगोलीतील मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.०९ इतकी आहे. मुलींनी वाढविली जिल्ह्याची शानविभागाची टक्केवारीऔरंगाबाद८८.१४बीड९१.८८परभणी७९.१६जालना८८.४५हिंगोली८०.८३एकूण८७.०६तालुका निहायनिकालाची टक्केवारीबीड९४़२९पाटोदा९३.९७आष्टी९४.२७गेवराई९३.७१माजलगाव८३.५३अंबाजोगाई८८.८२केज९३.७०परळी९०.४८धारूर८८.२२शिरूर९३.३३वडवणी९५.७१