शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

भिसेंच्या उमेदवारीचे बाशिंगबळ बलवान !

By admin | Updated: September 28, 2014 00:42 IST

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. त्र्यंबकनाना भिसे यांच्या उमेदवारीचे बाशिंगबळ बलवान ठरले. शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. त्र्यंबकनाना भिसे यांच्या उमेदवारीचे बाशिंगबळ बलवान ठरले. शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी धुसफूस सुरू केली होती. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हवा धीरज देशमुख यांच्या नावाची आली. मात्र ही हवा काही त्यांच्या उमेदवारीत बदलली नाही. तासाला एका नवीन चर्चेने ‘लातूर ग्रामीण’च्या उमेदवारीवरुन झालेल्या काँग्रेसच्या ढिसाळ नियोजनाच्या पोरखेळाने मात्र स्व. विलासराव देशमुखानंतर पोरकी झाल्याचे क्षणोक्षणी जाणवत होते. जशी लातूर ग्रामीणमधून त्र्यंबक भिसेंची उमेदवारी घोषित झाली. तशी कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी रेटली. पार मुंबई, दिल्लीपर्यंत सूत्रे हलली. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवार बदलण्याच्या हालचालीनी वेग घेतला. शनिवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.धीरज देशमुखांचे नाव येताच हौसी कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत रॅली गाठली. पण अपेक्षाभंग झाला आणि धीरज यांनीच स्वत: पुढे येत त्र्यंबक भिसे हेच उमेदवार असतील, असे घोषित केले. जिल्हा काँग्रेस कमिटीनेही पत्रक काढून भिसे हेच उमेदवार असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न सुरू केला. धीरज देशमुख यांच्या नावाची फक्त चर्चाच रंगली़ त्यांनी स्वत: भिसे नानांचे नाव जाहीर केल्याने चर्चेला पुर्णविराम मिळाला़ परंतु, त्यांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यातला उत्साह जाणवला नाही़पडद्याआड नेमके काय झाले ? हे मात्र अद्याप उघड झाले नाही. परंतु, आता त्र्यंबक भिसे हेच लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढणार आहेत़ कार्यकर्त्यांची मोट आता ते कशी बांधतात याकडे डोळे आहेत़ (प्रतिनिधी)४काँग्रेसमध्ये लातूर ग्रामीणच्या उमेदवारीवरुन दिवसभर लातुरात ढिसाळ नियोजनाचा चांगलाच पोरखेळ रंगला. स्व. विलासराव देशमुख यांच्यानंतर जिल्ह्याची काँग्रेस पोरकी झाली. याची प्रचिती आता येते आहे. दिलीपराव देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने आ. वैजनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते. परंतु त्यांचे सत्यकथनही पचनी पडले नाही. कारण अ‍ॅड. त्र्यंबकनाना भिसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारीवरुन ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेवटच्या दिवशी पुन्हा धीरज देशमुख यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र त्यांनीच भिसे हेच उमेदवार असल्याचे जाहीर केले. विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर यासारख्या शिस्तबध्द नेत्यांनी राबविलेले नियोजन आता या निवडणुकीत काँग्रेसने हरवून पोरखेळ केल्याची चर्चा कार्यकर्त्यात रंगली होती.