शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी आमच्या गावातील नाहीत !

By admin | Updated: May 12, 2015 00:51 IST

लातूर : वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने २५१ कर्जप्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज दिल्याचे माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आले असून

लातूर : वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने २५१ कर्जप्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज दिल्याचे माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आले असून, अनेक लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या जाती दाखविल्या आहेत़ लाभार्थ्यांचे पत्तेही चुकीचे आहेत़ दरम्यान, औसा तालुक्यातील लोदगा गावाचा पत्ता दर्शविण्यात आलेले तीन लाभार्थी आमच्या गावातील नसल्याचे ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे कळविले आहे़ त्यामुळे महामंडळाच्या कर्ज वितरणात काहीतरी घोळ असल्याचा संशय बळावला आहे़ वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयाच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या २५१ कर्जप्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज दिले आहे़ शिवाय, १५ ते २५ कर्जप्रकरणात एकाच लाभार्थ्याच्या वेगवेगळ्या जाती दर्शविल्या आहेत़ दरम्यान या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त मालिका प्रकाशित होताच काळे गल्ली येथील वसंत लिंबाजी घोडके यांनी माहितीच्या अधिकारात औसा तालुक्यातील लोदगा ग्रामपंचायतीकडे २५१ कर्जप्रकरणातील लोदग्याचा पत्ता दर्शविलेल्या ६ लाभार्थ्यांच्या गावाबाबत व जातीबाबत माहिती मागितली़ त्यानुसार लोदगा ग्रामपंचायतीने माहिती दिली असून, नरसिंग लक्ष्मण गायकवाड, श्रीपती माणिक जाधव, विनोद पोपटसिंग कतारी हे लोदगा येथील रहिवाशी नसल्याचे पत्र दिले आहे़ संजय बजरंग सुरवसे हे लाभार्थी मात्र आमच्या गावातील असून, ते भोई समाजाचे नसून वडार समाजाचे आहेत़ शिवाय, अशोक माधवराव जाधव हे भोई समाजाचे नसून कोल्हाटी समाजाचे तर प्रल्हाद बजरंग सूरवसे हे भोई समाजाचे नसून वडार समाजाचे असल्याचे पत्र लोदगा ग्रामपंचायतीने वसंत घोडके यांना दिले आहे़ प्रस्तुत लाभार्थ्यांची नावे २५१ कर्जप्रकरणात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जून भाईकट्टी यांना माहितीच्या अधिकारात मिळाली आहे़ (प्रतिनिधी)