खडसेंसह राज्यमंत्र्यांना खंडपीठाची नोटीस

By Admin | Updated: December 18, 2015 00:18 IST2015-12-18T00:06:08+5:302015-12-18T00:18:47+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.आय.एस. चिमा यांनी जळगावचे पालकमंत्री एकनाथ खडसे, नगर विकास राज्यमंत्री यांना नोटिसा बजाविण्याचा आदेश दिला.

The Bench's notice to the State Minister with Khadseen | खडसेंसह राज्यमंत्र्यांना खंडपीठाची नोटीस

खडसेंसह राज्यमंत्र्यांना खंडपीठाची नोटीस

औरंगाबाद : जळगाव येथील फुले मार्केटमधील गाळ्यांबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.आय.एस. चिमा यांनी जळगावचे पालकमंत्री एकनाथ खडसे, नगर विकास राज्यमंत्री यांना नोटिसा बजाविण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी नाताळाच्या सुटीनंतर होईल.
या याचिकेत खडसे यांना व्यक्तिश: प्रतिवादी करण्यात आले आहे. फुले मार्केटमधील ९ गाळ्यांसंदर्भात दाखल जनहित याचिका आणि जळगावच्या महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांनी दाखल केलेल्या याचिकांची गुरुवारी एकत्रित सुनावणी झाली.
फुले मार्केटमधील ६५१ गाळ्यांचा भाडेपट्टा (लीज) ३० मे २०१२ रोजी संपला. म्हणून मुंबई प्रांतिक मनपा कायद्याच्या कलम ८१ (ब) नुसार मनपा आयुक्तांनी गाळे रिकामे करण्याचा आदेश दिला. या आदेशाविरुद्ध गाळेधारकांनी जळगाव न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने ३० डिसेंबर २०१३ रोजी त्यांच्याविरुद्ध निकाल दिला. त्याविरुद्ध गाळेधारकांनी खंडपीठात याचिका दाखल केली. ती खंडपीठाने ८ मे २०१५ रोजी फेटाळली. तसेच या आदेशाविरुद्धची पुनर्विलोकन

Web Title: The Bench's notice to the State Minister with Khadseen