शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:30 IST

मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी गुरुवारी (दि.२८) दिले. मात्र, नगराध्यक्षांची निवड ही याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. याचिकेची पुढील सुनावणी १८ मार्चला होणार आहे. नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले.

ठळक मुद्देनिवड मात्र याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन; खंडपीठाचे स्पष्टीकरण

औरंगाबाद : मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी गुरुवारी (दि.२८) दिले. मात्र, नगराध्यक्षांची निवड ही याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. याचिकेची पुढील सुनावणी १८ मार्चला होणार आहे.नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले.मानवतच्या नगराध्यक्षा शिवकन्या नागनाथ स्वामी (खट्याळे) यांचे जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने अवैध ठरविले होते. त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त झाल्याने तेथे निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या आणि अपात्र घोषित करण्याच्या आदेशाला स्वामी यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. त्यावर प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने ८ आॅगस्ट २०१८ रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्यास मान्यता देऊन मतदान घेण्यास प्रतिबंध केला होता. याचिकेवर २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने मतदान घेण्यास परवानगी दिली. परंतु त्याद्वारे झालेली निवड ही याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एम. ए. गोलेगावकर, बाबूराव नागेश्वर यांच्यातर्फे अ‍ॅड. कैलास जाधव आणि निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. शिवाजी टी. शेळके यांनी काम पाहिले.------------

टॅग्स :Courtन्यायालयElectionनिवडणूक