शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

४२ केंद्रांवर कापूस खरेदीला सुरूवात

By admin | Updated: November 17, 2015 00:32 IST

बीड : कापूस खरेदी हंगामाला सुरूवात झाली असून, जिल्ह्यात ४२ केंद्रांवर कापूस खरेदीला गेल्या १५ दिवसांपासून सुरूवात झाली आहे.

बीड : कापूस खरेदी हंगामाला सुरूवात झाली असून, जिल्ह्यात ४२ केंद्रांवर कापूस खरेदीला गेल्या १५ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत १ लाख ६९ हजार ८२३ क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.कापूस हंगाम २०१५-१६ ला सुरूवात केली असून, आतापर्यंत केवळ बाजार समितीनेच कापूस खरेदीला सुरूवात केली आहे. सीसीआय कॉटन फेडरेशन व खासगी केंद्रांना अद्याप सुरूवात झाली नाही. मात्र, आगामी काळात ही केंद्रे लवकर सुरू होतील यात शंका नाही. बीड तालुक्यात ८, गेवराई - १०, माजलगाव - ६, धारूर - ४, परळी - ४, केज - २, वडवणी - २, कडा - ६ येथे कापूस खरेदी सुरू असून, ३१ आॅक्टोबर पर्यंत १ लाख ६९ हजार ८२३ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक भाव मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस अधिक भावाने खरेदी जाईल अशी आशा होती. मात्र, ती आता फोल ठरत आहे. किमान ४२०० ते कमाल ४४०० रूपये असा भाव प्रतिक्ंिवटलला दिला जात आहे. हमी दर भाव ३८०० ते ४१०० रूपयांदरम्यान आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील माजलगाव व गेवराई या भागात कापसाचे विक्रमी उत्पादन होते. गेवराई येथील कापूस परराज्यात विक्रीसाठी जातो.४मात्र, यावर्षी दुष्काळ मुक्कामी असल्यामुळे उत्पादन कमी झाला असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्ती करीत आहेत.४कापूस खरेदीचा हंगाम संपल्यानंतर गेल्या वर्षीची आणि या वर्षीच्या कापसाच्या खरेदीच्या तुलनेवरून किती फरक आला आहे याची आकडेवारी स्पष्ट होईल.४शासनाने हमी भाव वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. बाजार समितीच्या परवानाधारक केंद्रांवर कापूस खरेदीला येणाऱ्यांची संख्याही कमी आहे.४या ठिकाणावर अधिक भाव नाही मिळाला तर शेतकरी परराज्यात कापूस विक्री करतात हा जुना अनुभव आहे. परंतू सध्या कापूस बाहेर विक्रीसाठी नेण्यासारखी परिस्थिती नाही.४जिल्ह्यातच चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना माल घेऊन इतरत्र जाण्याची गरज राहणार नाही.