विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद पहिल्यांदाच बीड जिल्ह्याकडे!

By Admin | Updated: December 22, 2014 23:34 IST2014-12-22T23:34:42+5:302014-12-22T23:34:42+5:30

संजय तिपाले , बीड विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मान स्व़ गोपीनाथराव मुंडे यांना मिळाला होता; परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद आतापर्यंत एकदाही बीडला मिळाले नव्हते़

Beed district's opposition leader for the first time in the Legislative Council | विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद पहिल्यांदाच बीड जिल्ह्याकडे!

विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद पहिल्यांदाच बीड जिल्ह्याकडे!


संजय तिपाले , बीड
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मान स्व़ गोपीनाथराव मुंडे यांना मिळाला होता; परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद आतापर्यंत एकदाही बीडला मिळाले नव्हते़ आ़ धनंजय मुंडे यांच्या रुपाने सोमवारी इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची सूत्रे बीडकडे आली आहेत़ ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांना शह देण्यासाठीच राष्ट्रवादीने धनंजय यांना पुढे केल्याची चर्चा राजकीय वर्र्र्तुळात आहे़
राज्याच्या अन् देशाच्या राजकारणात प्रभाव राखणाऱ्या बीडने ग्रामविकास मंत्रीपदासोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद खेचून रुबाब कायम राखला आहे़ १९९१ मध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा सांभाळली होती़ तेंव्हा ५२ आमदारांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता़ तर ४२ आमदारांसह भाजपा तिसऱ्या स्थानी होता़ सुरुवातीला मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते़ मात्र, शिवसेनेत फूट पडली़ छगन भुजबळांनी बंडाचे निशाण झळकावल्यानंतर शिवसेनेचे संख्याबळ घटले अन् विधानसभेत भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला़ त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आले होते़
दरम्यान, गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर भाजपाने पंकजा मुंडे यांना कॅबिनेटमध्ये ग्रामविकाससारखे महत्त्वाचे खाते देऊन सन्मान राखलेला आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आ़ धनंजय मुंडे यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपवली. उल्लेखनीय म्हणजे बीडला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद कधीच मिळालेले नव्हते.४
गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा विरुद्ध धनंजय अशी बहीण भावाची ‘स्ट्रेट फाईट’ परळीत रंगली होती़ या निवडणुकीत धनंजय यांना पराभव पहावा लागला होता़ मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी पडल्यानंतरही राष्ट्रवादीने त्यांची विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी लावली़ त्यामुळे धनंजय हे युद्धात हरले असले तरी तहात मात्र त्यांनी बाजी मारली आहे़

Web Title: Beed district's opposition leader for the first time in the Legislative Council