शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अग्निजन्य खडकामुळे बीड ‘सेफझोन’मध्ये

By admin | Updated: May 15, 2015 00:50 IST

बीड : जिल्ह्यात कठीण अग्निजन्य खडक (डेक्कन ट्रॅप) मोठ्या प्रमाणात आहे. असा खडक असलेल्या भागांत मोठा भूकंप झाल्याची नोंद अद्याप कोठेही झालेली नाही

बीड : जिल्ह्यात कठीण अग्निजन्य खडक (डेक्कन ट्रॅप) मोठ्या प्रमाणात आहे. असा खडक असलेल्या भागांत मोठा भूकंप झाल्याची नोंद अद्याप कोठेही झालेली नाही. त्यामुळे बीड ‘सेफझोन’मध्ये असून चिंता करण्याचे कारण नाही, असा दावा भूजल व सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भू- वैज्ञानिक बी. एस. मेश्राम यांनी केला. भूकंपाच्या प्रकोपाने नेपाळमधील काठमांडू शहराला जबर हादरा बसला. पाठोपाठ उत्तर भारतातही भूकंप जाणवला. त्यानुषंगाने वरिष्ठ भू- वैज्ञानिक बी. एस. मेश्राम यांच्याशी गुरुवारी ‘लोकमत’ने बातचित केली. ते म्हणाले, १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी, सास्तूर येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचे धक्के संपूर्ण मराठवाड्याला बसले होते. एवढेच नाही तर बीड जिल्ह्यातील बालाघाटातील डोंगररांगांशी भूकंपाचे ‘कनेक्शन’ असल्याचा निर्वाळा भूवैज्ञानिकांनी दिला होता. त्यानंतर नागपूर येथील भूवैज्ञानिकांच्या पथकाने बीडमधील खडकांची पाहणी केली होती;परंतु लातुरातील भूकंपाशी संबंध असल्याचे पुरावे तेंव्हा सापडले नाहीत. लातूरमध्ये भूकंप झाला तेथे भूगर्भात दोन खडकांचा जोड आढळून आला होता. बीड जिल्ह्यातील खडक कठीण असून अशा प्रकारच्या खडकांमध्ये भूगर्भात भूकंपाची शक्यता कमी असते. दरम्यान, स्तरीय खडक (सेलेमेंटरी) आढळल्यास भूकंपाचा धोका जास्त असतो. मात्र, बीड जिल्ह्यात असा खडक कोठेही नाही. त्यामुळे भूकंपाची भीती बाळगण्याचे कारण नाही, असेही मेश्राम यांनी स्पष्ट केले. भूकंपाबाबत विविध गैरसमज आहेत. मात्र, भूगर्भात नैसर्गिक हालचाली झाल्या तरच धोका असतो. पाणीपातळी खालावल्याने भूकंप होत नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)