बीड पोलिसांचे आता स्वतंत्र अँड्रॉईड अ‍ॅपं

By Admin | Updated: August 18, 2015 00:09 IST2015-08-18T00:09:09+5:302015-08-18T00:09:09+5:30

बीड : जिल्हा पोलीस दलाने अत्याधुनिक सेवा सुविधेकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. बीड पोलिसांनी विकसित केलेल्या अँड्रॉईड अ‍ॅपचा पालकमंत्री पंकजा मुंडे

Bead police now has a separate Android app | बीड पोलिसांचे आता स्वतंत्र अँड्रॉईड अ‍ॅपं

बीड पोलिसांचे आता स्वतंत्र अँड्रॉईड अ‍ॅपं


बीड : जिल्हा पोलीस दलाने अत्याधुनिक सेवा सुविधेकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. बीड पोलिसांनी विकसित केलेल्या अँड्रॉईड अ‍ॅपचा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रारंभ करण्यात आला.
हे अत्याधुनिक अ‍ॅप पोलीस व जनतेतील दुवा म्हणून काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिक हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करू शकतात. यामुळे पोलिस प्रशासनाविषयीची माहिती नागरिकांना मिळणे सुकर होणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी खा. प्रीतम मुंडे, आ. प्रा.संगीता ठोंबरे, आ. आर. टी. देशमुख, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपअधीक्षक गणेश गावडे पाटील, निरीक्षक सी. डी. शेवगण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bead police now has a separate Android app