शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! डेंग्यू पसरू लागलाय..!

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

लातूर : डेंग्यू सदृश आजाराने जिल्ह्यात अनेकजण त्रस्त झाले आहेत़ गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढतच गेली़ लातूर शहरात मोठ्या प्रमाणात सर्दी, ताप, डोकेदुखीचे रूग्ण आढळून येत आहेत़

लातूर जिल्ह्यात डेंग्यूच्या आजाराने हळुहळू पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असताना आरोग्य विभाग अजूनही सतर्क झालेले नाही. गेल्या दोन महिन्यांत शासकीय सर्वोपचार रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात हजारो रुग्णांनी उपचार घेतले आहेत. आजही जिल्ह्यात हजारो रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने २३ रक्तजल नमुने तपासणीसाठी नांदेडच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. मात्र अजूनही त्याचा अहवाल आला नसल्याने आरोग्य विभागाची सतर्कता लक्षात येत आहे. निलंगा, औसा, रेणापूर, चाकूर तालुक्यांत डेंग्यूसदृश आजार वाढत असल्याचे चित्र आहे.लातूर : डेंग्यू सदृश आजाराने जिल्ह्यात अनेकजण त्रस्त झाले आहेत़ गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढतच गेली़ लातूर शहरात मोठ्या प्रमाणात सर्दी, ताप, डोकेदुखीचे रूग्ण आढळून येत आहेत़ शहरातील विविध रूग्णालयात जवळपास १९ डेंग्युचे रूग्ण उपचार घेत आहेत़ रविवारी एका ९ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे़ जिल्ह्यातील अनेक गावांत तापीचे रूग्ण वाढले आहेत़ आरोग्य विभाग मात्र कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करीत आपली जबाबदारी झटकत असल्याने दिसून येत आहे़लातूर शहरातील अनेक भागात कचऱ्याची दुर्गंधी आहे़ शिवाय, गटारीची सफाईही केली जात नसल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे़ डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे वाढल्याने तापीने त्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे़ नळाला येणारे आठवड्यातून एक दिवस पाणी हे सुध्दा या आजाराचे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे़ अचानकपणे ताप, डोकेदुखीचा त्रास वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे़ ग्रामीण भागातही तापीच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे़ खाजगी रूग्णालयात उपचार घेण्याऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे़ लातूर शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी भाजपाचे विजय क्षीरसागर, अ‍ॅड. प्रदीप मोरे, रामराव माने, स्मिता परचुरे, सुरेश राठोड, संजय सुरवसे यांनी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरात डेंग्यूने थैमान घातल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आहे.