शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Video : बँकेच्या सायरने उडविली मध्यरात्री सर्वांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 13:53 IST

सुरक्षेच्या कारणास्तव धावले सिडको एमआयडीसी पोलीस,नगरसेवक, कार्यकर्ते  

ठळक मुद्देअलार्मचे कनेक्शन तोडल्यानंतर एटीएममधील आवाज बंद झालापरंतु बँकेच्या आतील फायर अलार्मचे सायरने मोठ्या आवाजाने सुरू झाले.

औरंगाबाद : बँकएटीएम फोडणे, मशीन्स पळविणे, चोरी होणे या कारणांवरून एटीएम सुरक्षा सध्या चर्चेचा आणि गांभिर्याचा विषय झालेला आहे. शहरातील बहुतांश एटीएम सुरक्षारक्षकांविनाच आहेत. त्यांची सुरक्षा बँकेने सुरक्षारक्षक नेमून करण्याऐवजी बेजबाबदारपणे पोलीसांवरच सोपवून टाकली आहे. एटीएमला कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे एन-१ परिसरातील सिंडीकेट बँकेच्या सायरने शुक्रवारी पहाटेपर्यंत सर्वांची झोप उडवून टाकली. 

रात्री १ वाजेच्या सुमारास सायरनचा आवाज सुरू झाला, तो पहाटेपर्यंत सुरू होता. बँकेच्या व्यवस्थापला स्थानिक नगरसेवक मनोज गांगवे, विशाल गंगावणे, गणेश गांगवे, स्वप्नील चव्हाण आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी तासभर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यवस्थापकाने प्रतिसाद दिला नाही. शेवटी एमआयडीसी सिडको पोलीसांच्या रात्रगस्त पथकातील सहा ते सात कर्मचाऱ्यांनी एटीएमच्या आत जाऊन काही गडबड आहे का? याची खातरजमा केली. त्यानंतर नगरसेवक गांगवे यांना फायर अलार्म वाजत असल्याचे लक्षात आले. त्या अलार्मचे कनेक्शन तोडल्यानंतर एटीएममधील आवाज बंद झाला, परंतु बँकेच्या आतील फायर अलार्मचे सायरने मोठ्या आवाजाने सुरू झाले.

रस्त्यावर येणारा आवाज कमी झाला परंतु बँकेच्या आत धोकादायकरीत्या फायर अलार्म वाजण्यास सुरूवात झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थापकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही प्रतिसाद मिळाला नाही. बँकेच्या एटीएमबाहेर अशा घटना घडत असतील तर सुरक्षारक्षक नेमण्याची किती गरज आहे, हे या घटनेमुळे समोर आले आहे.

बहुतांश एटीएम सुरक्षारक्षकांविनाशहरातील बहुतांश एटीएम हे सुरक्षारक्षकांविना आहे. परराज्यातील टोळ्यांकडून एटीएम फोडून रक्कम लंपास करण्याच्या घटना मागील तीन ते चार महिन्यांत समोर आल्या आहेत. एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक असल्यास किमान चोरीच्या घटनांना आळा बसू शकेल. रात्री दोननंतर रक्कम काढल्यानंतर एटीएमचे सायरन वाजतात. परंतु ते अर्ध्या मिनिटांत बंद होतात. ते बंद झाले नाहीतर त्यासाठी सुरक्षारक्षक असणे गरजेचे असते, नसता सिंडीकेट बँकेसारखा प्रकार सर्वत्र घडल्यास पोलीसांना धावपळ करावी लागेल.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादatmएटीएमPoliceपोलिस